VATAPOURNIMA 2026 : वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी सौभाग्यवतींमध्ये उत्सुकता; पण नेमकी का आणि कशी साजरी करावी वटपौर्णिमा? जाणून घ्या शास्त्रीय कारण - टॉप न्यूज मराठी

दरवर्षी हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी हा सण 29 जून रोजी साजरा केला जाणार आहे. सौभाग्यवती स्त्रिया दरवर्षी हा सॅन साजरा करण्यासाठी उत्सुक असतात. मान्यतेनुसार अनेक जणींना केवळ सत्यवान सावित्रीची कथा देखील माहित असेल पण पौराणिक आणि अध्यात्मिक कथा आणि परंपरेला वैज्ञानिक देखील मोठं कारण आहे हे आज आपण जाणून घेऊया.

पौराणिक कथेनुसार सावित्रीने सत्यवानाचे प्राण याच झाडाखाली यमराज कडून परत मिळवले होते. त्यामुळे या दिवशी आपल्या पतीला उदंड निरोगी आयुष्य मिळावं यासाठी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री वडाच्या झाडाची पूजा करत असते. आता जर तुम्हालाही एवढीच कथा माहित असेल तर आवर्जून शास्त्रीय कारण देखील जाणून घ्या.

सौभाग्यवतींनो कधी हा विचार केलाय का की पौराणिक कथा जरी सांगत असली की सावित्रीने सत्यवानाचे प्राण हे वडाच्या झाडाखाली पुन्हा मिळवले. पण वडाचंच झाड का? असा जर प्रश्न विचारला गेला तर आवर्जून एकदा वडाच्या झाडाचा विस्तार आणि आयुष्य यावर लक्ष द्या. वडाच्या झाडाचा विस्तार हा इतर कोणत्याही मोठ्या वृक्षांच्या तुलनेत मोठा होत राहतो आणि त्याचबरोबर हा वृक्ष अगदी 200 वर्षापर्यंत देखील दिमाखात उभा असतो. मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन आणि अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या या वृक्षाला पूर्वजांनी निवडल आहे.

सौभाग्यवतींनी मनामध्ये श्रद्धा ठेवून हा सण आवर्जून साजरा करायलाच हवा. पतीच्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी ज्या पद्धतीने या वटवृक्षाचा विस्तार होतो त्याप्रमाणेच कुटुंबाचा विस्तार व्हावा, भरभराट व्हावी अशी प्रार्थना या वडाच्या झाडाकडे करा. मुळात अनेक स्त्रिया वेळ अभावी आणि शहरी भागांमध्ये एवढे मोठे वृक्ष सहजासहजी सापडत नाहीत म्हणून फांदी तोडून आणून त्या फांदीची पूजा करतात जे की अत्यंत चुकीच आहे. त्यापेक्षा या दिवशी सुवासिनीची ओटी भरा, वटवृक्ष जर जवळपास नसेल तर वटवृक्षाच रोप लावून हा दिवस जर साजरा केला तर अधिक भरभराट होईल.

अध्यात्मिक मान्यतेनुसार या दिवशी दानधर्माला देखील महत्त्व आहे. गरजू महिलेला या दिवशी सौभाग्याचे अलंकार, गोड पदार्थ दान करा. वडाच्या झाडाची पूजा करत असताना तांब्याच्या कलशांमध्ये पाण्यामध्ये थोडे काळे तीळ आणि गूळ घातल्यास नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन पतीला उदंड निरोगी आयुष्य मिळते अशी देखील मान्यता आहे.

 सुट्टी धागा सात वेळा वडाच्या झाडाला गुंडाळायचा असतो. वटवृक्षाला हा धागा गुंडाळत असताना प्रदक्षिणा घालत असते वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि पती आणि पत्नी मधील नातं अतूट राहावं आणि सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली जाते. तर मग सौभाग्यवतींनो येत्या 29 जूनला अगदी पहाटे साडेपाच वाजल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत चांगला मुहूर्त आहे. मनामध्ये चांगले भाव ठेवून वटवृक्षा जवळच पूजा करा आणि खरे आशीर्वाद मिळवण्यासाठी रोपांची लागवड करा.