US-Iran Peace Deal : अमेरिका आणि इराण दरम्यान तब्बल १०७ दिवसांपेक्षा जास्त काळ चाललेला भीषण संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या ऐतिहासिक शांतता कराराची (US-Iran Peace Deal) अधिकृत घोषणा केली आहे. या करारामध्ये पाकिस्तानने मुख्य मध्यस्थाची भूमिका बजावली असून दोन्ही देशांनी तत्काळ युद्धबंदी स्वीकारली आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार
जागतिक व्यापारासाठी आणि विशेषतः खनिज तेलाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) आता पूर्णपणे टोल-फ्री म्हणजेच शुल्कमुक्त खुली करण्यात आली आहे. अमेरिकन नौदलाने या भागात केलेली सागरी नाकेबंदी तातडीने उठवण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिले आहेत.
इराणच्या प्रमुख अटी आणि करारातील महत्त्वाचे मुद्दे
पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर तयार झालेल्या १४ कलमी मसुद्यानुसार, अमेरिकेने इराणचा गोठवलेला २४ अब्ज डॉलर्सचा परदेशी निधी टप्प्याटप्प्याने मुक्त करण्याचे मान्य केले आहे. लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया त्वरित आणि कायमच्या थांबवल्या जातील. पुढील ३० दिवसांत नौदल नाकेबंदी पूर्णपणे हटवली जाईल आणि इराणच्या तेल व पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील निर्बंध शिथिल केले जातील. इराण भविष्यात अण्वस्त्रे विकसित करणार नाही, अशी ग्वाही या करारात देण्यात आली आहे
या 14 अटी नक्की कोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊयात.
1- इराणचे तेल आणि पेट्रोकेमिकल्सवरील अटी हटवल्या जातील.
2- इराणच्या वित्तीय संसाधनांना पूर्ण अधिकार मिळेल, अमेरिकेने यावर निर्बंध लादले होते.
3- 60 दिवसांमध्ये इराणचे जे 24 अरब डॉलर गोठण्यात आली होती, त्यावरील निर्बंध काढले जातील.
4- इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांना सुमारे 300 अब्ज डॉलर्सच्या योजना सादर कराव्या लागतील.
5- लेबनानसह सर्व युद्ध तात्काळ बंद केले जाईल.
6- अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आणि इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे वचन देईल.
7- अमेरिकेने जी नाकेबंदी इराणजवळ लावली ती 30 दिवसाच्या आत पूर्णपणे हटवेल.
8- अमेरिकेचे सैन्य इराणच्या कोणत्याही भागात राहणार नाही आणि तिथून निघून जाईल.
9- होर्मुज खाडी पूर्ण सुरक्षेचा विचार करत 30 दिवसांच्या आत पुन्हा सुरू होईल.
10- अणुविषयक मुद्द्यांवर आणि निर्बंध पूर्णपणे उठवण्याबाबत अंतिम करारापर्यंत पोहोचण्यासाठी 60 दिवसांचा वाटाघाटींचा कालावधी सुरू होईल.
11- इराण अणुशस्त्रे न बनवण्याबाबतच्या आपल्या NPT अणुप्रसारबंदी करार अंतर्गत असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल.
12- अमेरिका या प्रदेशातील आपली लष्करी उपस्थिती न वाढवण्यास किंवा नवीन निर्बंध न लादण्यास सहमती दर्शवेल.
13- अंमलबजावणी पाहण्यासाठी एक देखरेख यंत्रणेची व्यवस्था केली जाईल. कोणत्याही अंतिम कराराला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे मान्यता दिली जाईल.
14- इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि तिथल्या रेझिस्टन्स ग्रुप्सना मिळणारा पाठिंबा हे या कराराचा भाग नाहीत.
या घोषणेनंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Brent Crude) किमतींमध्ये थेट ४% ते ४.६% टक्क्यांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे, ज्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल. होर्मुझ मार्ग खुला झाल्याने जागतिक जहाजांची वाहतूक आता विनाअडथळा आणि सुरक्षितपणे सुरू होईल. हा करार येत्या १९ जून रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे अंतिम स्वाक्षरीसाठी सादर केला जाणार असून, त्यानंतर ६० दिवसांचा संक्रमण काळ (Transition Period) सुरू होईल.
#topnewsmarathi #topnewsmarathipune #topnewsmaharashtra #Marathibreakingnews #marathinews #marathinewslive #superfast #topnewsmarathi #marathitopnewsnews #liveblog #liveupdate #todaybreakingnews #ताज्या_बातम्या #लेटेस्ट_व्हिडिओ #topstory #मराठी_बातम्या #latestmarathinews #US-IranPeaceDeal #usiran