Upside Down Village : जगातील एकमेव गाव जिथे माणसे उलटे झोपतात : कारण ऐकून बसेल धक्का, डॉक्टरही झाले चक्रावून - टॉप न्यूज मराठी

रंजक रोचक : आज आपण अशा गावाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे नाव ऐकताच तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. सोशल मीडियावर या गावाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे जिथे लोक सरळ नाही तर उलटे लटकून झोपतात. खरे तर हे गाव आहे फ्रान्समधील Equihen Plage नावाचे छोटेसे मासेमारी करणारे गाव. या गावात लोक उलटे लटकून झोपत नाहीत तर त्यांची घरे उलटी आहेत म्हणून त्याला upside down village म्हणतात.

या गावाची कहाणी 100 वर्ष जुनी आहे. या गावात पूर्वी मासेमारी करणारे लोक राहायचे. जेव्हा त्यांच्या बोटी जुन्या होऊन खराब व्हायच्या तेव्हा त्या बोटी फेकून देण्याऐवजी त्यांनी त्या बोटी उलट्या करून त्याची घरे बनवली. बोटीला उलटे करून त्यावर डांबर लावले आणि त्याला दरवाजा बसवला. याला तिथल्या भाषेत Quilles en l'air म्हणजे हवेत लटकलेली बोट असे म्हणतात.

दुसऱ्या महायुद्धात या गावातील सर्व बोटींची घरे नष्ट झाली. फक्त एकच घर वाचले होते. पण 1990 नंतर या गावाने पुन्हा तीच परंपरा सुरु केली आणि पर्यटकांसाठी अशी 8 उलटी घरं बनवली. आज या घरांमध्ये तुम्ही राहू सुद्धा शकता. या घरात एकच मोठी खोली असते जिथे किचन आणि बेडरूम एकत्र असते.

आता दुसरे गाव ज्यात लोक खरेच दिवसेंदिवस झोपतात ते म्हणजे कझाकिस्तानमधील Kalachi गाव. याला Sleeping Village असे म्हणतात. 2013 मध्ये या गावातील 140 लोक अचानक झोपून जायचे. चालता चालता, गाडी चालवताना झोपी जायचे आणि 3 ते 4 दिवसांनी जाग यायची. नंतर तपास केला तर समजले की जवळच्या जुन्या युरेनियम खाणीतून कार्बन मोनॉक्साईड गॅस गळती होत होती त्यामुळे असे होत होते.

तर सोशल मीडियावर जो दावा केला जातो की लोक वटवाघळासारखे उलटे झोपतात तो अर्धवट खरा आहे. लोक उलटे झोपत नाहीत तर त्यांची घरे बोटीपासून बनलेली उलटी आहेत जी पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात.