UPI चा नवा धमाका ! आता खात्यात पैसे नसले तरी पेमेंट होणार, RBI चा मोठा निर्णय; नवा नियम काय ? - टॉप न्यूज मराठी

पुणे : UPI वापरणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. आतापर्यंत UPI म्हणजे फक्त आपल्या बँक खात्यात असलेले पैसे दुसऱ्याला पाठवणे, एवढंच आपल्याला माहीत होतं. पण आता RBI ने UPI ला क्रेडिट कार्ड बनवलं आहे. याला म्हणतात - UPI Credit Line.

काय आहे हा नवा नियम ?

RBI ने 2023 मध्ये बँकांना परवानगी दिली होती की, तुम्ही ग्राहकांना UPI वर आधीच मंजूर केलेली कर्ज मर्यादा (Pre-approved Credit Line) देऊ शकता. आता 2025-26 मध्ये याची व्याप्ती वाढवली आहे. या आधी फक्त मोठ्या बँका ही सुविधा देत होत्या, आता Small Finance Bank सुद्धा देऊ शकतात. 

सोप्या भाषेत सांगायचं तर, बँक तुमच्या UPI अॅपमध्येच तुम्हाला 20 हजार, 50 हजार रुपयांपर्यंतची उधारीची सुविधा देईल. खात्यात पैसे नसले तरी तुम्ही त्या Credit Line मधून UPI पेमेंट करू शकाल.

सामान्य माणसाला फायदा काय ?

1) झटपट कर्ज: वेगळा लोन अर्ज करायची गरज नाही. बँकेने आधीच तुम्हाला ऑफर दिलेली असेल. फक्त UPI अॅपवर जाऊन Accept करायचं.

2) कॅश पण काढता येणार: आधी फक्त दुकानातच पेमेंट करता येत होतं. पण NPCI च्या नव्या नियमानुसार 31 ऑगस्ट 2025 पासून तुम्ही या क्रेडिट लाईनमधून दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवू शकता, रोख पैसे काढू शकता आणि छोट्या व्यापाऱ्यांनाही पेमेंट करू शकता.

3) FD वरही कर्ज: आता तुम्ही तुमच्या FD, शेअर्स, बॉण्डवर असलेल्या क्रेडिट लाईनला सुद्धा UPI ला लिंक करू शकता. 

काळजी काय घ्यावी ?

RBI ने 23 जून 2026 रोजी याबाबत नवीन नियम काढला आहे. बँक UPI द्वारे कर्ज देत आहे म्हणून त्याचे नियम हलके असणार नाहीत. जे नियम सामान्य पर्सनल लोनला आहेत, तेच UPI क्रेडिट लाईनलाही असतील. म्हणजे व्याज, हप्ता थकला तर CIBIL खराब होणारच. बँक तुमची परवानगी घेतल्याशिवाय ही सुविधा सुरू करू शकत नाही. त्यामुळे UPI अॅपवर अचानक 'Credit Line' चा मेसेज आला तर नीट वाचूनच Accept करा. व्याजदर किती आहे, हे नक्की तपासा. काही बँका 24% पर्यंत व्याज लावू शकतात, जे क्रेडिट कार्डपेक्षा जास्त असू शकते.

एकंदरीत, खिशात पैसे नसताना अडचणीच्या वेळी UPI Credit Line हे वरदान ठरू शकते, पण वापर जपून करा.

माहिती स्रोत - इंटरनेट