15 ऑक्टोबर 2026 पासून UPI पेमेंटमध्ये मोठा बदल होणार आहे. आतापर्यंत UPI ने व्यापाऱ्यांना कोणताही चार्ज लागत नव्हता, पण आता NPCI ने नवीन MDR म्हणजेच Merchant Discount Rate लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की आपले म्युच्युअल फंड SIP, OTT सबस्क्रिप्शन किंवा इतर बिले महाग होणार का.
नवीन नियम नेमका काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया.
NPCI च्या नवीन नियमानुसार 2000 रुपयांपेक्षा जास्त असलेल्या काही व्यापारी पेमेंटवर 0.4 टक्के MDR लागेल. म्हणजे जर तुम्ही 10,000 रुपयांचे पेमेंट केले तर दुकानदाराला 40 रुपये चार्ज लागेल. 75,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंटवर हा चार्ज जास्तीत जास्त 300 रुपयांपर्यंतच असेल.
पण यात वेगवेगळ्या कॅटेगिरीसाठी वेगवेगळे दर ठेवले आहेत.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे SIP महाग होणार नाही. जर तुम्ही UPI AutoPay द्वारे दरमहा SIP भरत असाल तर त्यावर कोणताही MDR लागणार नाही. NPCI ने स्पष्ट केले आहे की सर्व Recurring Mandate म्हणजेच AutoPay पेमेंट या चार्जमधून वगळले आहेत. त्यामुळे तुमची 5000 किंवा 10,000 रुपयांची SIP आहे, ती जशी होती तशीच राहील. सरकारनेही सांगितले आहे की ग्राहकांकडून थेट कोणताही चार्ज घेतला जाणार नाही.
OTT सबस्क्रिप्शनचेही तेच आहे. Netflix, Amazon Prime किंवा इतर OTT चे पैसे जर AutoPay ने जात असतील तर त्यावरही कोणताही चार्ज नाही.
मग चार्ज कशावर लागणार. जर तुम्ही एकावेळी मोठी म्युच्युअल फंड खरेदी करत असाल, म्हणजे One Time Investment करत असाल आणि UPI ने पैसे भरत असाल तर त्यावर 0.02 टक्के चार्ज लागेल. हा चार्ज जास्तीत जास्त 300 रुपये असेल. उदाहरणार्थ तुम्ही 5 लाख रुपयांची एकवेळ गुंतवणूक केली तर 100 रुपये चार्ज लागेल, जो बऱ्याच वेळा फंड हाऊस स्वतः भरते.
याशिवाय इन्शुरन्स प्रीमियम 2000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर फक्त 5 रुपये फ्लॅट MDR लागेल. रेल्वे, टेलिकॉम, पेट्रोल पंप यासाठीही हाच 5 रुपयांचा नियम आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मित्राला किंवा नातेवाईकाला UPI ने पैसे पाठवत असाल, म्हणजे Person to Person ट्रान्सफर करत असाल तर ते आजही पूर्णपणे फ्री राहणार आहे.
म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांसाठी लगेच कोणताही मोठा खर्च वाढणार नाही. हा खर्च दुकानदार, ब्रोकर आणि मोठ्या कंपन्यांना द्यावा लागणार आहे. त्यामुळे SIP सुरू ठेवायला घाबरण्याचे काहीही कारण नाही.