केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भारत-ग्रीस आर्थिक संबंध दृढ करण्यावर चर्चा केली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वित्तीय सेवा, फिनटेक, डिजिटल पेमेंट आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भारत-ग्रीस आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. त्यांनी ग्रीसमध्ये ग्रीसचे अर्थ आणि वित्त मंत्री किरियाकोस पिएराकाकिस यांची भेट घेतली. सामायिक समृद्धीला चालना देण्यासाठी भारतीय आणि ग्रीक संस्था व व्यवसायांमध्ये अधिक सखोल सहकार्याच्या मार्गांचाही दोन्ही बाजूंनी शोध घेतला. श्री. गोयल यांनी ग्रीसचे पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्री ख्रिस्तोस डिमास यांचीही भेट घेतली. त्यांच्यासोबत पायाभूत सुविधा, वाहतूक जोडणी, सागरी क्षेत्र, विमान वाहतूक आणि शाश्वत गतिशीलता या क्षेत्रांमध्ये भारत-ग्रीस सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. त्यांनी लवचिक पुरवठा साखळी तयार करण्यासाठी आणि भारत व युरोपमधील संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी सहकार्य अधिक दृढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली.