एंटरटेनमेंट : सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि चिकन लेग पीस म्हणून प्रसिद्ध असलेला उल्हास कामटे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. उल्हासला हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. मात्र उल्हासने स्वत: व्हिडीओ पोस्ट करून या अफवांचे खंडन केले आहे. आपण जिवंत असून व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना आहे असे त्याने स्पष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी उल्हास झाड फुंक या हॉरर सिनेमाच्या प्रीमियरला गेला होता. सिनेमातील भयावह सीन पाहून तो घाबरला आणि बेशुद्ध पडला. त्याला पॅनिक अटॅक आला होता. मित्रांनी त्याला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्याला हार्ट अटॅक आला नव्हता तर अँक्झायटी अटॅक आला होता. रुग्णालयात नेतानाचा तोच जुना व्हिडीओ व्हायरल झाल्याने मृत्यूची अफवा पसरली.