धाराशिव : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळखोरांचे जगणे मुश्किल केले आहे. राज्यात तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार हॉटेल रेस्टॉरंटवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी धाड टाकण्यात आली असून तब्बल २ लाख 11 हजार रुपयांचे दूध पावडर जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम शहरात विनापरवाना साठवून ठेवलेली ११२५ किलो तब्बल २ लाख 11 हजार रुपयांची दूध पावडर जप्त करण्यात आली आहे. ही दूध पावडर बाळासाहेब घोडके यानी साठवून ठेवली होती. या प्रकरणी आता भूम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान धाराशिवमधील भूम शहर हे खवा पेढा बनवणे. यांसाठी प्रसिद्ध आहे ग्राहकांच्या ताटापर्यंत शुद्ध दूध जाणं हा ग्राहकांचा हक्क आहे. असं तुकाराम यांनी म्हटलं आहे.
पुण्यात देखील मोठ्या हॉटेल्सवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर दुसरीकडे नागरिक मात्र मुंडे यांच्या या कारवाईमुळे समाधानी आहेत