Trupati Desai on Nasrapur case : तृप्ती देसाई यांनी नसरापूर घटनास्थळाची केली पाहणी - टॉप न्यूज मराठी

नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं उभा महाराष्ट्र हळहळला आहे. 

याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यात तृप्ती देसाई यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. तसेच आजूबाजूच्या नागरिकांशी, 

नातेवाईकांशी संवाद साधत घटनेविषयी अधिकची माहिती जाणून घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत त्यांनी संताप व्यक्त केला. 

या राक्षसी वृत्तीच्या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. केवळ फास्ट ट्रॅक कोर्टात केस जाऊन उपयोग नाही.

 याआधी देखील अनेक संवेदनशील प्रकरणात 5-6 वर्ष निकाल लागलेला नाही. 

तसं न होता लवकरात लवकर निकाल लावावा अशी मागणी त्यांनी केली.