Trending Lifestyle : गावाकडे चला ! Work From Home नंतर आता Work From Village ट्रेंड का वाढतोय ? - टॉप न्यूज मराठी

Trending Lifestyle : कोरोना नंतर Work From Home ही संकल्पना सगळ्यांना माहिती झाली, पण 2025-26 मध्ये आता Work From Village हा नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. याचा साधा अर्थ आहे की नोकरी शहरातल्या कंपनीचीच करायची पण राहायचे गावी. पुणे आणि मुंबई सारख्या शहरात घराचे भाडे, ट्रॅफिक आणि प्रदूषण खूप वाढले आहे. एका सामान्य वन बीएचकेचे भाडे पंधरा हजाराच्या पुढे गेले आहे. त्याच पैशात गावी स्वतःच्या घरात राहून महिन्याला वीस हजाराची बचत होते. हेच मुख्य कारण आहे की अनेक आयटी आणि बँकिंग क्षेत्रातले तरुण आता गावाकडे परतत आहेत.

याला दुसरे कारण म्हणजे इंटरनेट. आज तीन चार वर्षांपूर्वी गावात नेटवर्क नसायचे, पण आता लहान गावांमध्ये सुद्धा फायबर इंटरनेट आणि फाइव्ह जी नेटवर्क चांगले आले आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉल आणि लॅपटॉप वरचे काम अडकत नाही. अनेक गावात आता को-वर्किंग स्पेस सुद्धा सुरु झाले आहेत जिथे दिवसाला शंभर रुपये देऊन तुम्ही काम करू शकता. मानसिक शांती हा तिसरा मोठा फायदा आहे. शहरात सतत गोंगाट आणि धावपळ असते, त्यामुळे स्ट्रेस वाढतो. गावी सकाळी पक्ष्यांचा आवाज, शुद्ध हवा आणि घरचे गरम जेवण मिळते. अनेक कंपन्यांच्या रिपोर्ट नुसार गावातून काम करणारे कर्मचारी शहरापेक्षा जास्त प्रोडक्टिव्ह असतात कारण त्यांचे लक्ष विचलित होत नाही.

पण यात काही अडचणी पण आहेत. गावात अजूनही अचानक लाईट जाणे ही मोठी समस्या आहे. त्यासाठी इन्व्हर्टर असणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे घरी सगळे कुटुंब असताना कामात लक्ष लागणे कठीण होते. जर तुम्हाला हा प्रयोग करायचा असेल तर आधी एक महिना ट्रायल म्हणून गावी राहून बघा. घरात एक कोपरा फक्त ऑफिस म्हणून तयार करा आणि घरच्यांना तुमच्या कामाच्या वेळा सांगा. 

जसा एखाद्या ट्रेंडचा फायदा असतो तास तोटाही असतो पण तरुण सध्या वर्क फ्रॉम व्हिलेज ला अधिक प्राधान्य देत आहेत. तुम्ही कसे काम करणे पसंत कराल वर्क फ्रॉम होम, व्हिलेज कि ऑफिस ? कॉमेंट करून नक्की सांगा ! 

डिस्क्लेमर : हा लेख सध्याच्या ट्रेंड वर आधारित आहे, कंपनीची वर्क फ्रॉम होम पॉलिसी आधी तपासून घ्या.