TODAYS HOROOSCOP : वृषभ राशीसाठी आजचा दिवस कौटुंबिक सुखाचा ! तूळ राशीवर आज लक्ष्मी प्रसन्न, सुंदर दिवस ! - टॉप न्यूज मराठी

शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 आषाढ शुक्ल तृतीया नक्षत्र सायंकाळी 6:35 पर्यंत मघा त्यानंतर पूर्वा, रास सिंह 

राहू काळ सकाळी 10:30 ते 12

मेष रास 

मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. सर्व काही सुरळीत आहे. आज विशेष काही बदल करावा असं वाटणार नाही. रुटीन फॉलो कराल. मन प्रसन्न असल्यामुळे कुटुंबासोबत रात्री घरातच छान जेवणाचा बेत आखाल विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. 

वृषभ रास 

अनेक दिवसांपासून रखडलेली आर्थिक काम मार्गी लागणार आहेत. मन तणावात होते. दगदगीने देखील आता विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आज कुटुंबासोबत निवांत आनंदी वेळ घालवण्याच्या मूडमध्ये आहात. तब्येतही साथ देणार आहे. 

मिथुन रास 

अति विचार टाळा. कलेच्या क्षेत्रातील लोकांनी सरावाकडे लक्ष द्या. अवांतर गोष्टी तुमचे विचार केवळ भरकटवत आहेत. थोडी मानसिक विश्रांती घ्या आणि आज स्वतःचे रिस्टार्ट बटन दाबा. 

कर्क रास 

कर्क राशीसाठी आजचा दिवस छान आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे. नोकरदार वर्गासाठी देखील कार्यालयीन कामकाज सहजतेने- चातुर्याने पूर्ण कराल. तब्येतीची थोडी काळजी घ्या. बाकी दिवस उत्तम. 

सिंह रास 

आज अडचणी कमी होणार आहेत. विशेष करून तुम्ही जर अनेक दिवसांपासून कोणाला प्रेमाची साथ घालू इच्छित असाल तर आजचा दिवस होकार मिळवून देणार. खुश असाल आज. 

कन्या रास 

आज तुम्हाला एकाच वेळी खूप गोष्टी करायच्या आहेत. खरेदी करायची आहे, फिरायला जायचंय, कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. जोडीदारासोबत वेळ घालवायचा आहे. मित्रांसोबत वेळ घालवायचा आहे. थोडीशी उसंत घ्या. वेळेचे नियोजन करा. दिवस छान आहे. मजा कराल.  

तुळ रास 

प्रेम जीवनामध्ये होकार मिळाला आहे, किंवा आज मिळणार आहे, किंवा आज कोणीतरी खास व्यक्ती तुम्हाला मागणी घालणार आहे. धनलक्ष्मीची तुमच्यावर मोठी कृपा असणार आहे. त्यामुळे कार्यालयीन जीवनामध्ये पदोन्नतीची शक्यता दाट आहे. मेहनत करा, खुश रहा !

वृश्चिक रास 

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. थोडा निवांत वेळ घालवाल. सातत्याने केलेल्या कामाची दगदग आज नको वाटेल. पगार वाढ मिळू शकेल. नोकरीच्या शोधात असेल तर आज इंटरव्यू द्याच. 

धनु रास 

धनु राशीसाठी आज मान सन्मानाचा दिवस आहे. कार्यालय आणि घरात सन्मान मिळेल. तुमच्या शब्दाला वजन मिळेल. जोडीदार देखील आज तुमच्यावर खुश असेल.  स्वाभिमानाला खतपाणी घालणारा दिवस. 

मकर रास 

आज वाणीवर थोडं नियंत्रण ठेवा. तुम्हाला हवं तसं जग प्रत्येक वेळी चालेल असं होत नाही. थोडं मौन ठेवा आणि समोरच्याच मन समजून घेण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाजू चांगली राहील. आज थोडं आत्मपरीक्षण करण्याचा दिवस. 

कुंभ रास 

आज दिवस शांत आहे. साडेसाती आणि शनी महाराज परीक्षा घेत आहेत. पण मनाला नियंत्रित करण्याची कला आता तुम्ही शिकले आहात. संकट टळत नसते एका संकटानंतर दुसरे संकट येतच असते. त्यामुळे केव्हा संपेल हे दुःख अशी वाट पाहू नका. लढा त्यातच मनशांती आहे. तुम्ही खंबीर आहात.  

मीन रास 

तब्येत सांभाळा आणि योजना थोड्या गुप्त ठेवा. अगदी तुमच्या स्वतःच्याच या कानाला ऐकू जाणार नाही, हळू योजना तयार करा. तुमच्या भविष्यासाठी ती तुमची पुंजी राहणार आहे. यश मिळाल्यानंतर गाव जेवण घाला. मन खंबीर करा. समोर दिसणार सुख कदाचित मृगजळ आहे. साडेसातीचा दुसरा टप्पा आहे. ताकही फुंकून त्या !