Threat To Aamir Khan : "आमिर खान सारखे लोक लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहेत..!" बिश्नोई गँगची आमिर खानला धमकी - टॉप न्यूज मराठी

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता सलमान खान याला धमकीचे संदेश दिलेले आहेत. सध्या आता बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान याला बिष्णोई गँगने रडार वर ठेवले आहे. सोशल मीडियावर बिष्णोई गॅंगकडून आमिर खानला थेट धमकी देण्यात आली आहे. तथापि पोलीस प्रशासनापर्यंत अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. 

सोशल मीडियावरील या धमकीच्या संदेशानुसार आमिर खानच्या तिसऱ्या लग्नामुळे आतापर्यंत फतवा देखील जारी करण्यात आला होता. तर आता बिष्णोई गॅंगकडून लव जिहादला प्रोत्साहन दिल्या बाबत धमकी देण्यात आली आहे. 

धमकीच्या संदेशामध्ये नेमके काय 

मिळालेल्या माहितीनुसार, बिष्णोई गॅंग मधील आरजू बिष्णोई आणि टायसन बिश्नोई यांनी ही धमकी दिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, "जय श्री राम जय सीता राम

मी, आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई (लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य), असं जाहीर करतो की आमीर खानसारखे लोक आपल्या देशात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देत आहेत, ही गोष्ट आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे. आम्ही हे कृत्य खपवून घेणार नाही आणि त्याला लवकरच चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. हे कृत्य आपल्या सनातन धर्माच्या आणि राष्ट्राच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या बंधू-भगिनींना आणि देशवासियांना वचन देतो की, जो कोणी या घृणास्पद कृत्याला प्रोत्साहन देईल, त्याला आमच्या पद्धतीने धडा शिकवला जाईल. स्टारडमच्या नावाखाली जे लोक या गोष्टीला प्रोत्साहन देत आहेत, आम्ही त्यांचे श्वास रोखू...!" असं या पोस्टमध्ये लिहीलं आहे.

या धमकीबाबत अद्याप मात्र अमीर खान कडून कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून देखील या धमकीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.