"There are youngsters like "cockroaches", they don't get any employment" म्हणून सुरू झाली "कॉक्रोच" जनता पार्टी ! - टॉप न्यूज मराठी

दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर देशात उलथापालक सुरू झाली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली असून आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामे यांच्या मागणीबाबत स्वतः सोशल मीडिया पोस्ट करून माहिती दिली आहे. पण नेमकी ही कॉक्रोच जनता पार्टी कशी सुरू झाली आणि कॉकरोच असे नाव का देण्यात आले असा प्रश्न अनेकांना पडला असेल तरीही थोडक्यात माहिती...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा असलेली "Cockroach Janta Party - CJP" ही कोणतीही नोंदणीकृत राजकीय पार्टी नाही. ती एक तरुण-आधारित व्यंग्यात्मक ऑनलाइन चळवळ आहे जी एका न्यायालयीन विधानानंतर व्हायरल झाली.

1. सुरुवात कशी झाली?

CJP ची स्थापना 16 मे 2026 रोजी झाली. याचे संस्थापक आहेत अभिजीत दीपके - वय 30, बोस्टन युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आणि AAP साठी काम केलेले माजी राजकीय सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट.

15 मे 2026 रोजी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान काही बेरोजगार तरुण आणि कार्यकर्त्यांना "कॉकरोच" आणि "समाजाचे परजीवी" म्हटले होते. त्यांचे नेमके शब्द होते: "There are youngsters like cockroaches, they don't get any employment". नंतर CJI यांनी स्पष्टीकरण दिले की हे विधान फेक डिग्रीने नोकरी मिळवणाऱ्यांसाठी होते. 

पण तोपर्यंत हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बेरोजगारी, पेपर लीक आणि राजकीय उपेक्षेने त्रस्त तरुणांनी या अपमानाला विरोध करण्याऐवजी त्यालाच बॅज म्हणून स्वीकारले. 

2. 'कॉकरोच' हे नाव नेमके का?

या चळवळीचे नाव थेट CJI च्या विधानावरून घेतले गेले आहे.

- व्यंग्यात्मक प्रतिकार : ज्या शब्दाने तरुणांचा अपमान केला गेला, तोच शब्द अभिमानाने वापरण्याची रणनीती. "#MainBhiCockroach" हा हॅशटॅग ट्रेंड झाला.

- BJP ची नक्कल : 'जनता पार्टी' हे नाव जाणूनबुजून सत्ताधारी 'भारतीय जनता पार्टी' ची पॅरोडी म्हणून ठेवण्यात आले.

- आत्मपरिचय : CJP स्वतःला _"Voice of the Lazy & Unemployed"_ म्हणजे "आळशी आणि बेरोजगारांचा आवाज" असे म्हणवते. सदस्य होण्याची अटही मस्करीत दिली होती - 'बेरोजगार असावे, आळशी असावे, दिवसातून 11 तास ऑनलाइन असावे'.

3. किती मोठी झाली ही चळवळ?

शुरुवात एक जोक म्हणून झाली असली तरी ती काही दिवसांतच मोठी चळवळ बनली.

- Instagram वर 5 दिवसांत 21 मिलियन फॉलोअर्स - भाजप आणि काँग्रेसच्या एकत्रित फॉलोअर्सपेक्षा जास्त

- X वरील अकाउंट 4 दिवसांत 2 लाख फॉलोअर्सनंतर बंद करण्यात आले

- दिल्लीच्या जंतर मंतरवर निषेध मोर्चे आणि सामुदायिक सेवा उपक्रमही आयोजित केले.

4. मागण्या काय आहेत?

CJP ने व्यंग्यात्मक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात महिला आरक्षण, पक्षांतर करणाऱ्यांवर बंदी, निवडणूक घोटाळ्यांविरोधात कायदे, आणि पेपर लीक प्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. 

महत्वाचे : निवडणूक आयोगाकडे CJP ची नोंदणी झालेली नाही. सध्या ती एक व्यंग्यात्मक इंटरनेट चळवळ, मिम-आधारित कॅम्पेन आणि युवकांचा निषेधाचा प्लॅटफॉर्म म्हणून काम करते. 

राजकीय विश्लेषकांच्या मते, CJP ची लोकप्रियता ही देशातील वाढती बेरोजगारी आणि तरुणांच्या नैराश्याचे प्रतीक आहे. 

माहिती स्त्रोत : इंटरनेट