Thailand : बँकॉकमधील पबला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग ; 27 जणांचा मृत्यू !, - टॉप न्यूज मराठी

थायलंड : थायलंडची राजधानी बँकॉक येथे एका पबला लागलेल्या भीषण आगीत किमान २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील थायलंडमधील ही अशा प्रकारची सर्वात भीषण दुर्घटना मानली जात आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, चतूचक परिसरातील 'रोंग बीर ना लाट फ्राओ' या बारमध्ये शॉर्टसर्किटमुळे झालेल्या स्फोटानंतर आग इतक्या वेगाने पसरली की, अवघ्या काही सेकंदांत संपूर्ण परिसर दाट काळ्या धुराने आणि अंधाराने व्यापला. 

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओ मध्ये आगीचे भयानक तांडव पाहून मन हेलाऊन जाते. अनेक जण या आगीच्या भक्षस्थानी सापडले आणि वेदनेने होणारे आक्रोश भयानक  आहेत.  क्लबच्या आतील आणखी एका अस्पष्ट व्हिडिओमध्ये काही सेकंदांतच संपूर्ण परिसर भीषण आगीच्या ज्वाळांनी आणि दाट काळ्या धुराने भरून गेल्याचे दिसते. त्यावेळी लोक घाबरून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते .

स्थानिक प्रशासन काय म्हणले 

बँकॉकचे राज्यपाल चाडचार्ट सिट्टीपंट यांनी घटनास्थळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "आग अतिशय वेगाने पसरली आणि काही क्षणांतच छतापर्यंत पोहोचली. दाट धुरामुळेच बहुतांश मृत्यू झाले असावेत." त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला असून ६३ जण जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी 22 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांनी दिली.