देशातील सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. येत्या काही दिवसांत तुमच्या घरगुती बजेटवर महागाईचा मोठा भार पडण्याची शक्यता आहे. एफएमसीजी (FMCG) क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स'ने (Tata Consumer Products) आपल्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे देशातील लाखो ग्राहकांना थेट आर्थिक फटका बसणार आहे.
का वाढणार किमती?
कच्च्या मालाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे कंपनी लवकरच हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुनील डिसूषा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसामुळे चहाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, चहाच्या किमती आधीच ७% ते १०% वाढल्या आहेत. याशिवाय पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे मसाले, सुकामेवा आणि खाद्यतेलाचा आयात खर्चही वाढला आहे. वाढता उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी आणि कंपनीचा नफा टिकवण्यासाठी हा दरवाढ करण्याचा विचार सुरू आहे.
कोणत्या उत्पादनांवर होणार परिणाम?
कंपनी आगामी १५ ते ३० दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन या दरवाढीबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळे येत्या काळात गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत.