'बिग बॉस मराठी ५' चा विजेता सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजना चव्हाण यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. संजनाच्या डोहाळे जेवणाचा (Baby Shower) सोहळा नुकताच पारंपरिक पद्धतीने आणि अत्यंत उत्साहात संपन्न झाला आहे.
या सोहळ्यासाठी संजनाने एक सुंदर हिरव्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती. फुलांचे दागिने आणि चेहऱ्यावरील मातृत्वाच्या तेजाने तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते. सूरजची 'बिग बॉस'मधील खास मैत्रीण आणि मानलेली बहीण अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने या सोहळ्याला हजेरी लावली होती. तिने संजनाची पारंपरिक पद्धतीने ओटी भरली आणि सोशल मीडियावर "कुणी तरी येणार येणार गं..." या गाण्यासह व्हिडिओ शेअर करत "मी आत्या होणार" असा आनंद व्यक्त केला.
डोहाळे जेवणापूर्वी सूरज आणि संजना यांनी हातावर काढलेली मेहंदी खूप चर्चेत आली. संजनाच्या हातावर शिव-पार्वती, गणपती बाप्पा आणि चंद्रावर झोपलेल्या बाळाचे चित्र होते. तर सूरजने आपल्या हातावर 'मी बाबा होणार' आणि 'बेबी लोडिंग... प्लीज वेट' असे लिहून घेतले होते.
कार्यक्रमादरम्यान सूरजने गुडघ्यावर बसून संजनाला "बच्चा आय लव्ह यू" म्हणत प्रपोज केले. तसेच दोघांनी सूरजच्या सिग्नेचर 'झापुक-झुपूक' गाण्यावर एकत्र सुंदर डान्सही केला. सूरजने स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याच्या नेहमीच्या हटके स्टाईलमध्ये चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. तो म्हणाला, "तुमचा सूरज भाऊ आज लय खूश आहे... टॉपचा किंग तुमचा बाबा होणारे, म्हणजेच तुमचा सूरज चव्हाण देणार धप्पा, टॉपचा किंग होणार पप्पा!"
नोव्हेंबर २०२५ मध्ये बारामती येथे विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीवर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील चाहत्यांकडून आणि मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
#topnewsmarathi #topnewsmarathipune #topnewsmaharashtra #Marathibreakingnews #marathinews #marathinewslive #superfast #topnewsmarathi #marathitopnewsnews #liveblog #liveupdate #todaybreakingnews #ताज्या_बातम्या #लेटेस्ट_व्हिडिओ #topstory #मराठी_बातम्या #latestmarathinews
#jahnavikillekar #biggbossmarathi #surajchavan #killergirljahnavi