Suraj Chavan : गुलीगत स्टारच्या घरी आनंदाची बातमी, बिग बॉस फेम सूरज चव्हाणला पुत्ररत्न प्राप्ती - टॉप न्यूज मराठी

Suraj Chavan : बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सूरज चव्हाणला मुलगा झाला असून त्याची पत्नी संजना हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.

जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सूरज चव्हाणच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याच्या घरी चिमुकल्या बाळकृष्णाचा जन्म झाला आहे. हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सूरज आपली पत्नी संजना आणि नवजात मुलासोबत दिसत आहे. तो संजनाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्याच्या एका फॅनने शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सूरजने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण बाबा होणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये त्याने संजनासोबत लग्न केले होते. लग्नानंतर काही दिवसातच जान्हवी किल्लेकरने संजनाची चोर ओटी भरली होती आणि फोटो शेअर करत गूड न्यूज दिली होती. आता प्रत्यक्षात त्यांच्या घरी बाळाचे आगमन झाल्याने चव्हाण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. चाहत्यांकडून सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सूरज चव्हाण कोण आहे 

सूरज चव्हाण हा सोशल मीडियावर गुलीगत स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. रील्स आणि कॉमेडी व्हिडिओमधून तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभाग घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपलेसे केले. त्याच्या साध्या आणि मनमिळावू स्वभावामुळे त्याने बिग बॉस मराठी 5 ची ट्रॉफी जिंकली. आज तो महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय युवा स्टारपैकी एक आहे.