Supriya Sule : तातडीने राज्यात आणीबाणी जाहीर करावी, असं चित्र पूर्वी कधीच नव्हतं ! खासदार सुप्रिया सुळेंची मागणी - टॉप न्यूज मराठी

पुणे : खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी एकंदरीत पावसाचा कहर पाहता असे चित्र यापूर्वी कधीही नव्हतं, हे अतिशय चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने आढावा घेऊन महाराष्ट्रात आणीबाणी जाहीर करावी. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे Supriya Sule

पाऊस आणि पावसामुळे जो काही कहर महाराष्ट्रभरामध्ये पाहायला मिळतोय त्यावर चिंता व्यक्त करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "राज्यात यापूर्वीही पाऊस झाला आहे. मुंबई पुण्याला पाऊस नवा नाही, पण असंच चित्र पूर्वी कधीच नव्हतं. हे कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असून अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने आढावा घेऊन राज्यात आणीबाणी जाहीर करावी. महाराष्ट्राचा नेमकं चित्र काय आहे यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करणे आवश्यक आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे, जुना मुंबई पुणे महामार्ग आणि मिसिंग लिंकसह अनेक महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. आळंदीमध्ये पूरस्थिती आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी दरड कोसळत आहेत. अशा घटना समोर येत आहेत. राज्य सरकारने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील वस्तू स्थिती जनतेसमोर मांडावी. मिसिंग लिंक प्रकल्पाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. आणि सर्वांनी त्याचं स्वागतही केलं मात्र आता प्रकल्पाशी संबंधित समोर येणारे व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहेत. या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला असून अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. या प्रकल्पाचे सेफ्टी ऑडिट झाले होते का ? नैसर्गिक आपत्तीचा विचार करून नियोजन करण्यात आले होते काय ? याची माहिती सरकारन द्यावी..." अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

तसेच मुंबई आणि पुण्यासारख्या दोन प्रमुख शहरांतील संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकाच पावसाने संपूर्ण महाराष्ट्र पॅरालाइज झाल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत एखादा रुग्ण, डॉक्टर, विद्यार्थी किंवा अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे काय, याचाही विचार सरकारने करायला हवा,असही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.