पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या नसरापूर Nasarapur Rape and Murder Case गावातील साडेतीन वर्षाच्या लेकरावर 1 मे रोजी बलात्कार आणि निर्दयीपणे हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याला आज न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी आता खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नराधमाला भर चौकात फाशीची शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
१ मे रोजी नसरापुरचे प्रकरण जेव्हा उघडकीस आले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. 65 वर्षीय नराधम या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर काळ बनवून आला होता. एवढ्या लहान लेकरावर बलात्कार आणि त्यानंतर निर्दयीपणे त्याने तिची हत्या केली. एवढ होऊन देखील कोर्टात त्याने अनेक बचावासाठी कारणे दिली. पण अखेर अवघ्या 55 दिवसात न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल लावला. आज निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राने एक तरी सुस्कारा सोडला आहे. बलात्कार आणि त्यानंतर निर्दयीपणे हत्या अशा घटनांमध्ये महिनो-महिने चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आरोपींना शिक्षा होण्यास विलंब होतो. पण या प्रकरणामध्ये मात्र मुलीचे वय आणि प्रकरणाचे गांभीर्य त्याचबरोबर जनसमुदायाचा संताप पाहता पोलीस दलाने देखील वेगाने सूत्र फिरवली. दरम्यान या प्रकरणावर आता महाराष्ट्रातून पोलीस दलाचे आभार मानले जात आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील न्यायालयाच्या या निर्णयावर भाष्य करताना म्हटले आहे की, " महाराष्ट्र पोलीस दल, पुणे ग्रामीण पोलिसांचे खरंच आभार मानायला पाहिजे. कोर्टाचे देखील आभार मानले पाहिजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही यात राजकारण आणायचं नाही असं ठरवलं होतं. आम्ही या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटून आलो होतो. त्यांनी आम्हाला शब्द दिला. त्यामुळे पोलीस दल कोर्टाचे राजकारण बाजूला ठेवून आभार मानते. सगळ्यांनी मिळून न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचा पहिला टप्पा गाठला आहे. माजी मुख्यमंत्री आणि कोर्टाला नम्र विनंती आहे की या नराधमाला भर चौकात फाशीची शिक्षा व्हावी. खरंच त्याला ठेचून काढलं पाहिजे. परंतु आपला देश संविधानानुसार चालतो. त्यामुळे त्याला लवकरात लवकर भर चौकात फाशी द्या...!" अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.