Sunshine Vitamin : चिडचिड, उदासपणा, झोप न येणं... हे सगळं Vitamin D मुळे तर नाही ना ? - टॉप न्यूज मराठी

आज सकाळी एकदम भारी वाटतंय, सगळं करावंसं वाटतंय. दुसऱ्या दिवशी अंघोळ करायलाही कंटाळा येतोय.कधी कारण नसताना रडायला येतं, कधी छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होते.आणि कधी तर असं वाटतं की आयुष्यात काहीच मजा राहिली नाही. ओळखीचं वाटतंय ना ?  ह्याला "मी आळशी झाले आहे" किंवा "माझा स्वभावच असा आहे" म्हणून बाजूला सारू नका. कारण यामागे तुमचं मन नाही, तर तुमच्या शरीरातलं एक महत्वाचं व्हिटॅमिन कमी पडलं असू शकतं - ते म्हणजे Vitamin D. हो, हेच ते sunshine vitamin ज्याला आपण फक्त हाडांसाठी लागतं असं समजतो.

Vitamin D म्हणजे फक्त हाडं नव्हे, ते आहे 'मनाचं' ही व्हिटॅमिन

आपण लहानपणापासून ऐकतो की Vitamin D मुळे हाडं मजबूत होतात. बरोबर आहे. पण अलीकडच्या संशोधनातून एक नवीन गोष्ट समोर आली आहे. आपल्या मेंदूमध्ये जे happy hormones असतात ना - serotonin आणि dopamine - त्यांना बनवायला Vitamin D ची खूप गरज असते. जेव्हा शरीरात Vitamin D कमी होतं, तेव्हा ही happy hormones ची निर्मिती कमी होते. आणि मग काय ? आपोआपच मूड डाऊन, कंटाळा, चिडचिड आणि उदासीनता सुरू होते.

डॉक्टर सांगतात की झोपेचं चक्र पण Vitamin D मुळे कंट्रोल होतं. ते कमी झालं की रात्री झोप येत नाही, सकाळी उठल्यावर पण फ्रेश वाटत नाही. मग दिवसभर थकवा आणि बेचैनी !

ही लक्षणं तुमच्यात आहेत का ? एकदा चेक करा ! खाली दिलेल्या पैकी 3 पेक्षा जास्त लक्षणं जुळत असतील तर एकदा Vitamin D टेस्ट करून घ्या.

1.  सकाळी अलार्म वाजला तरी अंथरुणातून उठावसं वाटत नाही, थकवा जातच नाही

2.  दिवसभर काहीच करावंसं वाटत नाही, सगळं निरस वाटतं

3.  मित्रांशी बोलायचा, बाहेर जायचा कंटाळा येतो

4.  छोट्या गोष्टींवरून पटकन चिडचिड होते

5.  एकटं वाटतं, कोणी समजून घेत नाहीये असं वाटतं

6.  काही शारीरिक त्रास नाही, पण तरीही "मला बरं वाटत नाहीये" अशी भावना असते

ही सगळी लक्षणं फक्त डिप्रेशनमुळेच होतात असं नाही. बऱ्याचदा Vitamin D च्या कमतरतेमुळेही होतात.

सूर्यप्रकाशात बसा ! 

रोज सकाळी 8:30 च्या आधी 20 ते 30 मिनिटं उन्हात बसा. हात, पाय आणि चेहरा थोडा उघडा ठेवा. खिडकीच्या काचे मागून चालत नाही, थेट सूर्यप्रकाश लागला पाहिजे. हा निसर्गाचा फ्री व्हिटॅमिन डी चा डोस आहे.

योग्य आहार 

आहारात तूप, लोणी, अंडी, दूध, बदाम, जवसाच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बियांचा समावेश करा. Vitamin D हे फॅट मध्ये विरघळतं, त्यामुळे फॅट सोबत घेतल्यास शरीरात चांगलं शोषलं जातं.

डॉक्टरांचा सल्ला

जर टेस्टमध्ये कमतरता खूप जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घ्यावे लागतात. पण लक्षात ठेवा, टेस्ट न करता स्वतःहून गोळ्या चालू करू नका.

त्यासोबत 10 मिनिटं ध्यान, प्राणायाम किंवा वॉक केलं की मूड अजून बरा होतो.

मन, शरीर आणि सूर्य यांचं एक खूप जुना नातं आहे. आपण 4 भिंतींमध्ये बसून, उन्हाला टाळून राहू लागलो आणि मग म्हणतो "मूड ठीक नाही". तर आजपासूनच ठरवा. फोन बाजूला ठेवा आणि 15 मिनिटं गॅलरीत, टेरेसवर किंवा सोसायटीच्या खाली जाऊन ऊन अंगावर घ्याचं ! कारण कधी कधी आनंदासाठी मोठी थेरपी नको असते, फक्त थोडा सूर्यप्रकाश आणि थोडं Vitamin D पुरेसं असतं.