Sunil Anand Passed Away : प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांच्या मुलाचे निधन - टॉप न्यूज मराठी

लंडन : बॉलिवूडच्या प्रसिद्ध आनंद कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांचे सुपुत्र सुनील आनंद यांचे सोमवारी सकाळी लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. योगायोग म्हणजे 2011 मध्ये देव आनंद यांनीही याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता.सुनील यांच्या निधनाची माहिती पुतणी जीना नारंग यांनी दिली. त्यांनी कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर करण्याचे आवाहन केले.

सुनील आनंद यांच्याविषयी :

सुनील हे देव आनंद आणि कल्पना कार्तिक यांचे एकुलते एक अपत्य होते. शिक्षणानंतर त्यांनी 1984 मध्ये *'आनंद और आनंद'* मधून अभिनयात पदार्पण केले. वडिलांसोबत हा चित्रपट होता. त्यानंतर काही चित्रपट केले, पण देव आनंद यांच्यासारखी ओळख निर्माण करू शकले नाहीत. देव यांच्या निधनानंतर ते लंडनमध्ये स्थायिक झाले होते.

सुनील यांच्या जाण्याने आनंद कुटुंब आणि बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.