महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला शहराशी जोडणाऱ्या आणि दळणवळणाचे मुख्य साधन असलेल्या एसटी बस अर्थात लालपरीत सुधारणा व्हाव्या
यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून वेळोवेळी प्रयत्न झाले.
आता ST BUS ची प्रतिमा अधिक आधुनिक आणि आकर्षक करण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. मराठी तसंच बॉलिवूड अभिनेता रितेश आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख आता एसटी महामंडळाचा चेहरा असणार आहेत.
रितेशने एसटीशी त्याचं असलेलं खास कनेक्शनही सांगितलं आहे. तो म्हणाला,
"माझ्या वडिलांनी एसटीनेच जास्तीत जास्त प्रवास केला आहे.
लातूर, पुण्याला ते एसटीनेच प्रवास करायचे. बाभळगावमध्ये त्यांचा एसटीत बसल्याचा फोटोही आहे.
त्या फोटोत ते जिथं बसले ती त्यांची आवडती जागा, म्हणजे एसटीची खिडकी"