Sonam Vangchuk Helth Update : सोनम वांगचुक यांनी औषधे घेण्यास दिला नकार ! नेमकी परिस्थिती काय ? - टॉप न्यूज मराठी

दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक Sonam Vangchuk यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान Dharmendra Pradhan यांनी राजीनामा द्यावा यासाठी वीस दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. 20 दिवस उपोषण सुरू असल्या कारणामुळे सध्या त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. जंतर-मंतरवर त्यांचे उपोषण सुरू होते. दरम्यान आज सकाळी त्यांची तब्येत सातत्याने ढासाळत असताना आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयामध्ये त्यांना आज दाखल करण्यात आल आहे. पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने आंदोलन स्थळावरून हलवून थेट रुग्णालयात दाखल केलं. यावेळी आंदोलन स्थळी प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आल्या नंतर डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जाहीर केले. ज्यामध्ये डॉक्टरांनी सांगितले आहे की, " सोनम वांगचुक यांच्या शरीरातील पाण्याची पातळी प्रचंड घटली आहे. त्यामुळे त्यांना डीहायड्रेशनची लक्षणे आहेत. रक्ताची चाचणी घेण्यात आली.. रक्तात पोटॅशियमचे प्रमाण घटल्याचं निदान झाले आहे. नाडी, रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी स्थिर होती." अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान सोनम वांगचूक यांनी मात्र कोणतीही औषध घेण्यास स्पष्ट नकार दिल्याचं समजते आहे. 

सध्या सोनम मानचूक हे रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. प्रकृती स्थिर आहे. दरम्यान त्यांची पत्नी गीतांजली अंगमो यांनी त्यांना दुसऱ्या चांगल्या रुग्णालयात दाखल करावे अशी मागणी देखील केली असल्याचे समजते आहे. या घटनेने आज प्रचंड खळबळ उडाली असून नेमकं आता हे प्रकरण काय वळण घेत हे लवकरच समजेल.