नवी दिल्ली : NEET-UG 2024 पेपर लीक प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतरही कॉकरोच जनता पार्टी CJP चे आंदोलन सुरूच आहे. CJP चे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी यावर प्रतिक्रिया देत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका स्पष्ट केली.
सोनम वांगचुक म्हणाले, "हा विजय फक्त एका राजीनाम्याचा नाही. हा 23 लाख विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. पण आमचे आंदोलन इथेच थांबणार नाही. ‘हा लोकशाहीचा विजय आहे. हा थेट रस्त्यावरून उमटलेल्या प्रत्यक्ष लोकशाहीचा विजय आहे. हा शांतता, संयम आणि सातत्यपूर्ण संघर्षाचाही विजय आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज सर्वांत महत्त्वाचा असतो आणि जेव्हा नागरिक शांततापूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडतात, तेव्हा त्याचा परिणाम दिसून येतो. आंदोलकांनी सातत्याने आपल्या हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी ठामपणे आवाज उठवला." असे ते म्हणाले आहेत.
IT'S A VICTORY OF DEMOCRACY
direct democracy... straight from the streets.
It's a victory of peace, patience & persévérance.
Congratulations CJP, Gen Z of the nation and thank you all citizens for shedding fear and the fear of fear and rising up from every corner of the nation.
FROM ACCOUNTABILITY, NOW TO REFORMS
आता या 3 मागण्या प्रलंबित
राजीनामा मिळाल्यानंतरही CJP च्या आणखी 3 प्रमुख मागण्या आहेत. सोनम वांगचुक यांनी त्या सांगितल्या:
1. आर्थिक मदत - पेपर लीक प्रकरणामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी
2. पोलिसांवर कारवाई - आंदोलनादरम्यान आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. डीसीपी संदीप लांबा आणि एसीपी अजय शर्मा यांची नावे त्यांनी घेतली
3. गुन्हे मागे घेणे - 20 जुलैनंतर आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत
"अभिजीत दीपके यांनी बरोबर म्हटले आहे - आम्ही कॉकरोच आहोत. आम्ही लगेच मैदान सोडणार नाही. जोपर्यंत शेवटच्या विद्यार्थ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही जंतर-मंतर सोडणार नाही," असे सोनम वांगचुक यांनी ठणकावून सांगितले. सध्या CJP चे आंदोलन जंतर-मंतरवर सुरूच आहे. सरकार आता या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.