दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा संसदेवर येऊन धडकला आहे. एकीकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान Union Education Minister Dharmendra Pradhan अमित शहा Amit Shaha यांच्या भेटीला गेले आहेत. तर दुसरीकडे कोकरोच जनता पार्टीचे CJP प्रवक्ते सौरभ दास आणि अशितोष रांका हे मंत्री जे पी नड्डा यांच्या भेटीला पोहोचले असल्याचे समजते आहे.
जंतर-मंतर आणि संसदेवर हालचालींना वेग आलेला असतानाच रुग्णालयात दाखल करण्यात आलेले सोनम वांगचूक यांनी रुग्णालय प्रशासनाकडे त्यांना डिस्चार्ज देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार आज संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला आहे. हा मोर्चा थोपवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि धुराच्या नळकांड्या देखील सोडल्या असल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये काही विद्यार्थी आणि समर्थक जखमी झाल्याची माहिती असली तरीही पोलिसांनी ही माहिती अमान्य केली आहे.
दरम्यान " माझ आरोग्य पूर्णपणे चांगलं असून सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य आहेत. त्यामुळे किमान तात्पुरता तरी मला रुग्णालयातून डिस्चार्ज द्यावा, जेणेकरून मला संसदेवर निघालेल्या मोर्चात सहभागी होता येईल." अशी मागणी उपोषणकर्ते सोनम वांगचूक यांनी रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे.