दिल्ली : गेल्या वीस दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक Sonam Vangchuk हे उपोषणाला बसले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोचे जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी वीस दिवसांपासून उपोषण सुरू केलं. दरम्यान आतापर्यंत त्यांच्या वजनात 9 किलोने घट झालीये. त्यामुळे आज पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष सध्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे लागले आहे. वीस दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे उपोषण सुरू केले आहे. त्याचबरोबर नीट पेपर फुटल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केल्या. या आत्महत्यांना देखील सरकारला जबाबदार धरलं पाहिजे. असं वक्तव्य सोनम वांगचुक यांनी केलं.
दरम्यान काल त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटलं होतं की, 20 जुलै पर्यंत जिवंत राहायचे आहे. 20 जुलैला चलो संसद हे आंदोलन केले जाणार होते. दरम्यान आज सोनम वांगचुक यांची आरोग्य परिस्थिती पाहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.