Sohail Khan Health Update : बॉलिवूड अभिनेता सोहेल खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वजन कमी झालेल्या लूकमुळे चर्चेत आहे. Amazon Prime वरील रिअॅलिटी शो 'The Alliance' च्या पार्टीमधील त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी आरोग्याबत आणि त्यासाच्या अचानक घटलेल्या वजनाबाबत चिंता व्यक्त केली होती. काहींनी तर त्याने Ozempic सारखी वजन कमी करणारी औषधे घेतली असल्याचा अंदाजही बांधला होता. यावर अखेर स्वतः सोहेलनच मौन सोडलं आहे.
नेटकऱ्यांच्या कॉमेंट्सवर स्पष्टीकरण देताना सोहेल म्हणाला कि, वजन कमी होण्यामागे कोणतीही वजन कमी करणारी गोळी किंवा फॅट बर्नर नाही. 'Alliance' हा पहिलाच रिअॅलिटी शो होता. घरात गेल्यावर सुरुवातीच्या काही दिवसांत त्याला थोडी क्लॉस्ट्रोफोबिया सारखी भावना झाली. त्यातच पहिल्याच आठवड्यात त्याला पोटाचा आजार झाला. "पोटाचा आजार झाला आणि त्यामुळे मला काय खातोय याकडे लक्ष द्यावे लागले. शोचे चॅलेंजेस करायचे होते, नवीन मित्रांसोबत शेवटपर्यंत राहायचे होते, म्हणून खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागले" असे तो म्हणाला. क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे अशा व्यक्तीला बंदिस्त ठिकणी राहणे अशक्य वाटते . मन अस्वस्थ होते. त्याने पुढे सांगितले की, "त्यामुळे Ozempic नाही, फॅट बर्नर नाही, फक्त सगळ्यांचे प्रेम आणि आपुलकी आहे". आजारी असतानाही स्पर्धकांनी दाखवलेल्या काळजीमुळे 5 आठवडे शोमध्ये टिकून राहिला.
सलमाननेही केला खुलासा
शोच्या फिनाले वीकमध्ये सलमान खान सोहेलला सपोर्ट करायला आला होता. तेव्हा एका व्हायरल व्हिडिओत सलमानने विचारले असता सोहेलने सांगितले की त्याने 12 किलो वजन कमी केले आहे. त्यानंतर सलमाननेही "मी 16 किलो वजन कमी केले आहे" असा खुलासा केला.
सोशल मीडियावर टीका, अश्मित पटेलने केली पाठराखण
वजन कमी झाल्यामुळे काही नेटिझन्सनी सोहेलला "वयस्कर आणि निस्तेज" दिसत असल्याचे कमेंट्स केल्या. यावर त्याचा मित्र आणि 'Fight Club' चा सह-कलाकार अश्मित पटेलने पाठिंबा दिला. "सगळेच वृद्ध होतात. तुमच्या घरी वडीलधारी नाहीत का ? ही मूर्खपणा आहे" असे तो म्हणाला.
सध्या सोहेलने स्पष्ट केले आहे की त्याचे वजन कमी आजार, तणाव आणि डाएटमुळे नैसर्गिक पद्धतीने झाले आहे, कोणत्याही शॉर्टकटमुळे नाही. त्यामुळे सोहेलच्या अचानक बदललेल्या लूकबाबत सध्यातरी चर्चा थंडावल्या आहेत.