SKIN CARE TIPS : पावसाळ्यात चिकट त्वचा आणि मुरुमांचा त्रास वाढलाय ? या 6 स्किनकेअर टिप्सनी मिळवा ग्लासस्किन - टॉप न्यूज मराठी

पुणे : मान्सून आला की वातावरण आल्हाददायक होतं, पण सोबत स्किनच्या समस्या घेऊन येतो. हवेतील आर्द्रता 80% च्या वर गेल्याने त्वचेच्या तेलग्रंथी जास्त अॅक्टिव्ह होतात. त्यामुळे चिकटपणा, पोर्स बंद होणे, ब्लॅकहेड्स आणि मुरुमांचा त्रास दुप्पट वाढतो.

पावसाळ्यासाठी Dermatologist च्या 6 महत्वाच्या स्किनकेअर टिप्स

1. दुहेरी क्लिन्झिंग - दिवसातून 2 वेळा चेहरा स्वच्छ करा

पावसाळ्यात एकदाच फेसवॉश करून चालत नाही. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि मऊ कापडाने टिपून कोरडा करा. 

कसा करायचा ? पहिल्यांदा ऑइल बेस्ड क्लिन्झर किंवा मायसेलर वॉटरने मेकअप, सनस्क्रीन आणि घाण काढा. नंतर सलिसिलिक अॅसिड 1% किंवा टी ट्री असलेला जेल फेसवॉश वापरा. याने पोर्समधील अतिरिक्त तेल आणि बॅक्टेरिया निघून जातात. साबण किंवा जास्त फेसाळणारा फेसवॉश टाळा, त्याने त्वचा अजून कोरडी होऊन जास्त तेल तयार होते.

2. टोनर आणि एक्सफोलिएशन स्किप करू नका

आठवड्यातून 2 वेळा जेंटल एक्सफोलिएशन करा. AHA/BHA असलेला टोनर वापरा. याने डेड स्किन सेल्स निघतात आणि पोर्स बंद होत नाहीत. 

1 चमचा कॉफी पावडर + 1 चमचा दही मिसळून 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. आठवड्यातून 1 दाच करा, जास्त स्क्रब केल्याने मुरुम फुटू शकतात.

3. "ऑइली स्किनला मॉइश्चरायझर नको" हा सर्वात मोठा गैरसमज

पाऊस असला तरी मॉइश्चरायझर सोडू नका. जेव्हा त्वचा कोरडी होते तेव्हा ती अजून जास्त तेल तयार करते. 

काय वापरावे? जेल बेस्ड, वॉटर बेस्ड, नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर. हायलुरोनिक अॅसिड आणि नायसिनामाइड असलेले जेल बेस्ट आहेत. ते हलके असतात आणि त्वचेत पटकन मुरतात.

4. सनस्क्रीन ही पावसाळ्याचीही गरज आहे

ढगाळ वातावरण असले तरीही UVA किरणे त्वचेच्या आत जातात आणि काळे डाग, अकाली वृद्धत्व आणतात. 

SPF 50 PA+++ असलेले जेल किंवा फ्लुइड सनस्क्रीन निवडा. ते चिकट नसतात. घराबाहेर जाण्याच्या 20 मिनिटे आधी लावा आणि 3-4 तासांनी रि-अप्लाय करा.

5. आठवड्यातून 2 वेळा क्ले मास्क

मुलतानी माती, बेंटोनाइट क्ले किंवा चारकोल मास्क तेल शोषून घेतात. 

घरगुती रेसिपी : 2 चमचे मुलतानी माती + गुलाबपाणी + 2 थेंब टी ट्री ऑइल. 15 मिनिटे लावून कोमट पाण्याने धुवा. याने मुरुमांची सूज कमी होते आणि त्वचा मॅट दिसते.

6. आतून आणि बाहेरून काळजी घ्या

फक्त बाहेरून क्रीम लावून चालणार नाही. पाणी 3-4 लिटर प्या. तळले, जास्त साखर आणि डेअरी प्रोडक्ट कमी करा. त्याने हार्मोनल मुरुम वाढतात. चेहरा वारंवार हाताने टच करू नका. उशीचे कव्हर, फोनचा स्क्रीन आणि मास्क आठवड्यातून 2 वेळा स्वच्छ करा. यावर बॅक्टेरिया जमा होतात.

कधी डॉक्टरांकडे जावे ?

जर मुरुमांमध्ये पू भरला असेल, मोठे सिस्टिक मुरुम असतील किंवा घरगुती उपायांनी २ आठवड्यात फरक पडत नसेल तर त्वचारोगतज्ञांचा सल्ला घ्या. सेल्फ-मेडिकेशन आणि पिंपल पॉप करणे टाळा, त्याने काळे डाग पडतात.