चित्रसृष्टीतील अनावश्यक चमतकारोक्त बाजूला सारत, ‘Shri Baba Neeb Karori Maharaj’ हा चित्रपट प्रेक्षकांना एका भक्ति आणि मानवी मूल्यांचा प्रवासावर घेऊन जातो.
चित्रपटाच्या जगत संतांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट येत असतात. या चित्रपटातून माहिती, प्रेरणा मिळते. तर काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून जातात. ‘Shri Baba Neeb Karori Maharaj’ हा चित्रपट सुद्धा त्यापेकीच एक आहे. हा चित्रपट फक्त बाबांच्या जीवनातील घटना दर्शवत नयही ट्र त्यांच्या विचारसरणी, भक्तनवरील प्रेमाचा आणि मानवतेच्या संदेशाचा अनुभव रसिकांना देतो.
चित्रपटातील अनेक प्रसंग भावुक आहेत, तर काही प्रसंग हे रसिकांना विचार करायला भाग पडणारे आहेत. विशेष म्हणजे चित्रपटात कथा सांगताना कुठेही अनावश्यक उत्कंठा किंवा अतिरंजनाचा आधार घेतलेला नाही. बाबांची भूमिका ही कलाकार सुबोध भावे यांनी निभावली आहे. सुबोध भावे यांनी भूमिका साकारताना अतिशय संयमित आणि प्रभावी अभिनय केला आहे. त्यांच्या अभिनयात बनवतपणा जाणवत नाही. दिसणारा प्रत्येक प्रसंग प्रामाणिक वाटतो.
या चित्रपटाचे दिग्दर्शन शरद सिंह ठाकूर यांनी केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ही त्याची मोठी जमेची बाजू आहे. धार्मिक विषय हाताळतान दिग्दर्शकाने श्रद्धा आणि सिनेमैटिक मांडणी यांचा उत्तम समतोल साधला आहे. कथा प्रेक्षकांना व्यस्त ठेवते आणि शेवटपर्यंत रस कायम ठेवते.
संगीत आणि पार्श्वसंगीत चित्रपटाच्या कल्पनाविश्वाला अधिक समृद्ध बनवतात. काही सीनमध्ये संगीतमुळे भवन अधिक तीव्रतेने पोहचतात. आजच्या काळात चित्रपट प्रामुख्याने मनोरंजनभोवती फिरताना दिसतात. ‘Shri Baba Neeb Karori Maharaj’ सारखा चित्रपट आशेचा किरण वाटतो.
या चित्रपट मोठ्या कौतुकाचा हक्कदार आहे. हा चित्रपट बघताना आपण फक्त प्रेक्षक नाही राहत तर एक धार्मिक प्रवासाचा भाग बनतो. प्रत्येक व्यक्तीने हा चित्रपट नक्की पाहावा. प्रत्येक कुटुंब,भक्त आणि अर्थपूर्ण अर्थपूर्ण सिनेमाचे आवडणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून बघावा. हा फक्त चित्रपट नाही तर एक दिशा दाखवणार चित्रपट आहे.