आतापर्यंत आपण माणसांची अनेक ब्युटी पार्लर पाहिली असतील, पण कधी जनावरांसाठी खास 'ब्युटी पार्लर' पाहिलंय का? हे ऐकून नवल वाटलं ना पण सत्यात उतरलं आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मान्याचीवाडी ग्रामपंचायतीनं हा अशक्य वाटणारा प्रयोग प्रत्यक्षात आणत तब्बल 82 पुरस्कार पटकावले आहे.
' नक्की कसं आहे हे ब्युटी पार्लर आणि काय आहे यामागची संकल्पना? पाहूयात
आतापर्यंत आपण माणसांची अनेक ब्युटी पार्लर पाहिली असतील, पण कधी जनावरांसाठी खास 'ब्युटी पार्लर' पाहिलंय का? हे ऐकून नवल वाटलं ना पण सत्यात उतरलं आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मान्याचीवाडी ग्रामपंचायतीनं हा अशक्य वाटणारा प्रयोग प्रत्यक्षात आणत तब्बल 82 पुरस्कार पटकावले आहे. ' नक्की कसं आहे हे ब्युटी पार्लर आणि काय आहे यामागची संकल्पना? पाहूयात
ग्रामीण भागात सकाळ झाली की शेतकरी आपली जनावरे घेऊन नदी किंवा ओढ्यावर जातात. तिथेच जनावरांना धुतलं जातं. पण यामुळे होतं काय?
तर जनावरांच्या अंगावरील घाण, मलमूत्र थेट जलस्त्रोतांमध्ये मिसळतं आणि नदीचं पाणी प्रदूषित होतं.
शिवाय, अस्वच्छ पाण्यामुळे जनावरांनाही त्वचेचे आजार होतात. हीच समस्या ओळखून पाटणच्या मान्याचीवाडीने एक धाडसी निर्णय घेतला आणि
लोकसहभागातून उभं राहिलं महाराष्ट्रातलं पहिलं जनावरांचं 'ब्युटी पार्लर' या ठिकाणी जनावरांना आंघोळ घालण्यासाठी अत्याधुनिक स्नानगृह तयार करण्यात आलं आहे.
येथे चक्क शॉवरची व्यवस्था आहे. दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे जनावरांच्या अंगावरील घाण काही मिनिटांत स्वच्छ होते. पण हे फक्त आंघोळीपुरतं मर्यादित नाही. या प्रकल्पाचं खरं वैशिष्ट्य आहे त्याचं पाणी व्यवस्थापन!
आंघोळीनंतर निघणारं सांडपाणी एका प्रक्रियेतून जातं. तिथं कचरा आणि पाणी वेगळं केलं जातं.
प्रक्रिया केलेलं हे पाणी वाया न घालवता चक्क गावातील परसबागांसाठी वापरलं जातं. या मान्याचीवाडी गावातील अभिनव उपक्रमाचं सध्या प्रचंड कौतुक होताना पाहायला मिळत आहे.