RTO मध्ये खेटे मारायचे टेन्शन संपले ! घरबसल्या 10 मिनिटात काढा ड्रायव्हिंग लायसन्स; ही आहे संपूर्ण स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस - टॉप न्यूज मराठी

आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी RTO मध्ये वारंवार जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारने संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन केली आहे. फक्त मोबाईलवरून तुम्ही लर्निंग लायसन्स ते परमनंट लायसन्सपर्यंत सर्व काही करू शकता.

स्टेप 1 - लर्निंग लायसन्ससाठी अर्ज

सर्वात आधी http://parivahan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे 'Driving License Related Services' वर क्लिक करा. तुमचे राज्य निवडा, मग 'Apply for Learner License' वर क्लिक करा.

फॉर्ममध्ये आधार कार्ड, मोबाईल नंबर, पत्ता भरा. कागदपत्रे म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा. फी ऑनलाईन भरा - दुचाकी आणि चारचाकीसाठी सुमारे 350 ते 500 रुपये.

स्टेप 2 - घरबसल्या परीक्षा द्या

हा सगळ्यात मोठा बदल आहे. आता RTO ला जाऊन परीक्षा देण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या मोबाईलवरूनच ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. ट्रॅफिकचे नियम, सिग्नल यावर 15 प्रश्न विचारले जातात. 10 प्रश्न बरोबर आले की तुम्ही पास. पास झाल्यावर 5 मिनिटात लर्निंग लायसन्स PDF तुमच्या मोबाईलवर येते.

स्टेप 3 - परमनंट लायसन्स कसे मिळवावे ?

लर्निंग लायसन्स मिळाल्यानंतर 30 दिवसांनी आणि 180 दिवसांच्या आत तुम्ही परमनंट लायसन्ससाठी अर्ज करू शकता. पुन्हा त्याच वेबसाईटवर 'Apply for Driving Licence' वर क्लिक करा. लर्निंग लायसन्स नंबर टाका. इथे तुम्हाला RTO मध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते. टू-व्हीलरसाठी 8 आकारात गाडी चालवणे आणि फोर-व्हीलरसाठी कार पार्किंग, रिव्हर्स ही टेस्ट असते.

नवीन नियम काय आहे ?

1 जून 2024 पासून नवीन नियम लागू झाला आहे. आता तुम्ही सरकारमान्य प्रायव्हेट ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ट्रेनिंग घेतले तर RTO टेस्टची गरज नाही. स्कूलच तुम्हाला सर्टिफिकेट देईल आणि त्यावरून थेट लायसन्स मिळेल.

महत्वाच्या टिप्स

- वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.

- आधार लिंक मोबाईल नंबर जवळ ठेवा, OTP येतो.

- बनावट वेबसाईटपासून सावध रहा, फक्त http://parivahan.gov.in हीच सरकारी वेबसाईट आहे.

या पद्धतीने 1 महिन्यात तुमचे लायसन्स घरपोच येते.