RTO ची मोठी कारवाई आजपासून सुरू ! तुमची गाडी दुसऱ्या राज्यातील असेल तर सावधान - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्रात दुसऱ्या राज्याच्या नंबर प्लेट असलेल्या गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने आज 5 ऑक्टोबर पासून 13 दिवसांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम 5 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.

काय आहे हा नियम?

परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सर्व RTO आणि Dy RTO ना आदेश दिले आहेत. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 47 नुसार, एका राज्यात नोंदणी झालेली गाडी दुसऱ्या राज्यात फक्त 12 महिन्यांपर्यंत वापरता येते. जर 12 महिन्यापेक्षा जास्त काळ ती गाडी महाराष्ट्रात वापरायची असेल तर तिला महाराष्ट्रात पुन्हा नोंदणी करणे बंधनकारक आहे आणि महाराष्ट्राचा रोड टॅक्स भरणे गरजेचे आहे.

कोणत्या गाड्यांवर कारवाई होणार?

ही कारवाई सर्व बाहेरच्या गाड्यांवर नाही. ज्या लोकांनी कमी टॅक्स असलेल्या राज्यात गाडी रजिस्टर केली आहे पण वापर मात्र पूर्ण वेळ महाराष्ट्रात करत आहेत अशा गाड्यांवर कारवाई होणार आहे. बऱ्याच जणांनी BH नंबर किंवा इतर राज्यांचा नंबर कमी टॅक्ससाठी घेतला आहे.

तपासणी कशी होणार?

RTO ची पथके, फ्लाईंग स्क्वॉड, चेक पोस्ट यांची टीम मोठ्या शहरांमध्ये, IT पार्क, औद्योगिक वसाहती, सोसायट्यांच्या पार्किंग मध्ये तपासणी करणार आहेत. जर गाडी 12 महिन्यापेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात असल्याचे आढळले तर गाडी जप्त केली जाऊ शकते, पुन्हा नोंदणी करावी लागेल आणि टॅक्स वसूल केला जाईल. सर्व कारवाईची नोंद Google Sheet वर ठेवली जाणार आहे.

पुन्हा नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे लागतील?

मूळ RC, Insurance, PUC, NOC सर्टिफिकेट मूळ राज्याच्या RTO कडून, फॉर्म 27, 28 आणि गरज असल्यास फायनान्स कंपनीचे NOC.

त्यामुळे जर तुमची गाडी MH सोडून इतर राज्याची असेल आणि तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात राहत असाल तर ताबडतोब जवळच्या RTO मध्ये जाऊन Re-registration ची प्रक्रिया पूर्ण करा, नाहीतर 17 ऑक्टोबर पर्यंत कारवाई होऊ शकते.