Rhea Anil Kapoor’s earrings worth Rs. 1.35 crore stolen : रिया अनिल कपूर यांच्या दागिन्यांची चोरी, ज्वेलरकडून भाड्यानं घेतलेले 1 कोटी 35 लाखांचे दागिने चोराकडून लंपास - टॉप न्यूज मराठी

Rhea Anil Kapoor’s earrings worth Rs. 1.35 crore stolen : रिया अनिल कपूर यांच्या दागिन्यांची चोरी, ज्वेलरकडून भाड्यानं घेतलेले 1 कोटी 35 लाखांचे दागिने चोराकडून लंपास

अभिनेते अनिल कपूर यांची कन्या, चित्रपट निर्माती आणि फॅशन स्टायलिस्ट रिया कपूर हिचे तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जगप्रसिद्ध मेट गाला इव्हेंटसाठी न्यूयॉर्कला जात असताना ही चोरी झाल्याची माहिती मिळतेय. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत तब्बल 1 कोटी 35 लाख असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कार्यक्रमात परिधान करण्यासाठी नामांकित ज्वेलर्सकडून (भाड्यावर) (रेंट देऊन) दागिने घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रिया कपूर हिच्या टीमने या इव्हेंटसाठी दोन वेगवेगळ्या ज्वेलर्सकडून हिरे आणि पाचू जडित महागडे कानातले भाड्यावर (रेंट देऊन) घेतले होते. 

 

२७ एप्रिल रोजी रात्री रिया कपूर हिची संपूर्ण टीम मुंबईहून एमिरेट्स विमानाने दुबईमार्गे न्यूयॉर्कसाठी रवाना झाली होती. रिया कपूरची मेकअप आर्टिस्ट सावलिन सिंग हिने दोन्ही दागिन्यांचे बॉक्स तिच्या हँडबॅगमध्ये ठेवले होते. २८ एप्रिल रोजी संध्याकाळी न्यूयॉर्कमधील 'द पियर हॉटेल'मध्ये पोहोचल्यानंतर, जेव्हा सावलिनने दुसऱ्या टीम मेंबरला देण्यासाठी हँडबॅगमधील बॉक्स उघडले, तेव्हा दोन्ही बॉक्स रिकामे होते. 

मुंबईत परत आल्यानंतर मेकअप आर्टिस्ट सावलिन सिंग हिने या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार मुंबईच्या सहारा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही चोरी मुंबई विमानतळावर झाली, विमानातील प्रवासादरम्यान झाली की न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यावर झाली, याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस संपूर्ण टाइमलाइन आणि सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत आहेत

कोण आहे रिया कपूर? (Who Is Reha Kapoor?)

रिया कपूर ही बॉलिवूडमधील एक आघाडीची चित्रपट निर्माती आणि फॅशन स्टायलिस्ट आहे.  बॉलिवूडचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची ती दुसरी मुलगी आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर हिची ती सख्खी बहीण, तर अभिनेता हर्षवर्धन कपूरची मोठी बहीण आहे.  रियाने अत्यंत कमी वयात चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आणि मुख्यत्वे महिला-केंद्रित चित्रपटांची निर्मिती केली. सोनम कपूर आणि अभय देओल स्टारर आयशा या चित्रपटातून तिने वयाच्या २१ व्या वर्षी निर्माती म्हणून करिअरची सुरुवात केली. सोनम कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या खूबसूरत या यशस्वी चित्रपटाची निर्मिती तिने केली. करीना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्कर अभिनीत विरे दी वेडिंग या ब्लॉकबस्टर चित्रपटाची ती सह-निर्माती होती. तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सॅनन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या क्रू (Crew - 2024) या सुपरहिट चित्रपटाची निर्मितीही रियानेच केली आहे.  सोनम कपूरच्या अनेक आयकॉनिक आणि आंतरराष्ट्रीय फॅशन लुक्समागे (उदा. कान फिल्म फेस्टिव्हल) रिया कापुरचेच योगदान असते. सोनम कपूरसोबत तिने 'ऱ्हेसॉन' (Rheson) हा कपड्यांचा स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे.