पुणे : RBI ने फेब्रुवारी 2026 च्या पतधोरण आढाव्यात रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. पण गेल्या एका वर्षात RBI ने व्याजदरात मोठी कपात केली असल्याने गृहकर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये रेपो रेट 6.50 टक्के होता, तो आता 5.25 टक्के झाला आहे. म्हणजे एका वर्षात 1.25 टक्क्यांची कपात झाली आहे.
रेपो रेट हा असा दर आहे, ज्या दराने RBI इतर बँकांना कर्ज देते. RBI ने रेपो रेट कमी केला की बँकांनाही स्वस्तात पैसा मिळतो आणि त्या ग्राहकांना स्वस्तात कर्ज देऊ शकतात. त्यामुळे Home Loan, Car Loan चे EMI कमी होतात.
2025 मध्ये 1.25 टक्के कपात झाल्याचा थेट फायदा सध्या दिसत आहे.
समजा तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे.
IIFL आणि Union Bank च्या रिपोर्टनुसार महागाई 2 ते 4 टक्क्यांच्या आत असल्याने RBI 2026 मध्ये आणखी 0.25 ते 0.50 टक्के कपात करू शकते. जर असे झाले तर रेपो रेट 5 टक्क्यांपर्यंत येईल आणि Home Loan आणखी स्वस्त होईल.
जर तुमचे कर्ज Repo Linked असेल तर बँका आपोआप दर कमी करतात. जर तुम्ही जुन्या MCLR वर असाल तर त्वरित बँकेत जाऊन Repo Linked Lending Rate मध्ये कन्व्हर्ट करून घ्या. यासाठी बँका 2000 ते 5000 रुपये फी घेतात, पण दीर्घकाळात लाखोंचा फायदा होतो. तसेच बँका नवीन ग्राहकांना कमी दर देतात, त्यामुळे दुसऱ्या बँकेत Balance Transfer करण्याचाही विचार करू शकता.