RBI ची मोठी तयारी! बाजारात येणार १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा - टॉप न्यूज मराठी

भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच १० आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.  सध्याच्या कागदी नोटा पूर्णपणे बंद करण्याचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नसला, तरी प्लास्टिक नोटा आणण्याच्या दिशेने महत्त्वाच्या हालचाली सुरू आहेत.

​RBI ची नोटा छापणारी कंपनी 'भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड' ने प्लास्टिक नोटांसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी जागतिक स्तरावर‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’  मागवला आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत.

या योजनेच्या सुरुवातीला १० आणि २० रुपयांच्या नोटांची पायलट चाचणी घेतली जाऊ शकते. या नोटा विशेष प्रकारच्या प्लास्टिक किंवा पॉलिमर फिल्मवर छापल्या जातात.

​

काय आहेत प्लास्टिक नोटांची वैशिष्ट्ये? 

या नोटांमध्ये एक पारदर्शक  सुरक्षा विंडो आणि आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये असतात, ज्यामुळे हुबेहूब बनावट नोटा तयार करणे अत्यंत कठीण होते. ​या नोटा पाण्यात खराब होत नाहीत आणि सहजासहजी फाटत नाहीत. कागदी नोटांच्या तुलनेत प्लास्टिक नोटा तब्बल अडीच ते चार पट जास्त काळ टिकतात, असा अंदाज आहे.

​सध्या या प्रकल्पाची प्राथमिक तयारी सुरू असून, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.