अभिनेते राजेश शर्मा यांनी आज तागायात अनेक चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. दरम्यान सध्या ते फौजी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हैदराबादमध्ये या चित्रपटाच शूटिंग सुरू असताना त्यांना एका कीटकांन चावा घेतला. त्यानंतर ते शूटिंग संपवून घरी गेल्यानंतर त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जाते. यावर अद्याप रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट माहिती दिलेले नाही. .
याविषयी फौजी चित्रपटाच्या टिमने दिलेल्या माहितीनुसार, अशा कोणत्याही घटनेबद्दल त्यांना माहिती नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांचं शूटिंगचं काम पूर्ण केलं होतं. त्यामुळे अशी कोणतीही परिस्थिती त्यांच्यावर ओढावली आहे याबाबत स्पष्ट माहिती नाही असं या चित्रपटाच्या टीमने म्हटला आहे.
तर दुसरीकडे राजेश शर्मा यांचे वैयक्तिक सहाय्यक सुभाषित पांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश शर्मा यांना डायबिटीसमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं म्हटलं आहे. आणि लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे, असं सांगण्यात आला आहे. दरम्यान अभिनेत्री सुदीप चॅटर्जी हिने या घटनेबाबत तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. पण ही पोस्ट काही तासातच डिलीट करण्यात आली आहे. त्यामुळे नेमकं राजेश शर्मा यांची प्रकृती आता कशी आहे याबाबत समजू शकले नाही.