गोल्ड रिफायनिंग आणि ज्वेलरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'राजेश एक्सपोर्ट्स' (Rajesh Exports) मध्ये तब्बल १५.१५ लाख कोटी रुपयांचा रेव्हेन्यू घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे भांडवली बाजार नियामक 'सेबी' (SEBI) च्या फॉरेन्सिक तपासणीत समोर आले आहे. सेबीच्या ३ जून २०२६ च्या अंतरिम आदेशानंतर हा खळबळजनक खुलासा झाला असून, यामुळे सरकारी विमा कंपनी LIC (भारतीय आयुर्विमा महामंडळ) देखील मोठ्या संकटात सापडली आहे.
राजेश एक्सपोर्ट्सने आर्थिक वर्ष २०२१ ते २०२५ (FY21 to FY25) दरम्यान आपल्या कमाईचे (Consolidated Revenue) आकडे तब्बल १५.१५ लाख कोटी रुपयांनी फुगवून (Inflated) दाखवले. कंपनीने दाखवलेल्या एकूण महसुलांपैकी ९७ ते ९९% व्यवहार हे त्यांच्या स्वित्झर्लंडमधील आणि इतर परदेशी सबसिडीअरी कंपन्यांच्या नावावर खोटे (Non genuine) दाखवले होते.
कंपनीचे चेअरमन राजेश मेहता यांनी कंपनीचा पैसा स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळवून त्याद्वारे 'डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग' (Derivative Trading) केल्याचा आरोप आहे. त्यांच्या खात्यात सुमारे ३३९ कोटी रुपयेपाठवले गेले. कागदपत्रांवर आफ्रिकेतील सोन्याच्या खाणींमध्ये गुंतवणूक केल्याचे दाखवले गेले, मात्र फॉरेन्सिक ऑडिटमध्ये याचे कोणतेही सबळ पुरावे किंवा अधिकृत कागदपत्रे आढळली नाहीत. 'BDO इंडिया' या फॉरेन्सिक ऑडिट करणाऱ्या संस्थेला कंपनीने आवश्यक कागदपत्रे न देता तपासात अडथळे आणले.
LIC आणि सामान्य गुंतवणूकदारांवर काय परिणाम?
LIC चा मोठा हिस्सा: मार्च २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार, LIC कडे या कंपनीची तब्बल १०.८०% हिस्सेदारी (Stake) आहे. यामुळे पॉलिसीधारकांच्या पैशांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.
शेअर्स धडाधड कोसळले: सेबीच्या या कारवाईनंतर राजेश एक्सपोर्ट्सच्या शेअर्सला लोअर सर्किट (Lower Circuit) लागले असून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.
कॅनरा बँकेची कारवाई: कंपनीवर कॅनरा बँकेचे ५०९ कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याने बँकेने या खात्याला 'स्ट्रेस्ड एक्सपोजर' (Stressed Exposure) घोषित केले आहे.
सेबीने या बाबत कडक निर्णय घेतला आहे. सेबीने मुख्य प्रवर्तक आणि चेअरमन राजेश मेहता यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास (Trading) पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच कंपनीच्या शेअर्सच्या खरेदी-विक्रीवरही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
#topnewsmarathi #topnewsmarathipune #topnewsmaharashtra #Marathibreakingnews #marathinews #marathinewslive #superfast #topnewsmarathi #marathitopnewsnews #liveblog #liveupdate #todaybreakingnews #ताज्या_बातम्या #लेटेस्ट_व्हिडिओ #topstory #मराठी_बातम्या #latestmarathinews