Raj Thackeray : "भविष्यात भाजपला त्रास होणारच !", राज ठाकरे यांचे भाकीत, नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर - टॉप न्यूज मराठी

मुंबई : सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर खोडाफोडीच राजकारण सुरू आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून थेट सहा खासदारांच्या गळती नंतर आता हळूहळू आमदार देखील शिंदे गटाकडे आकर्षित होत आहेत शिंदे गटातील दोन खासदारांना केंद्रात मंत्रिपद देखील मिळते आहे एकंदरीत ज्या हालचाली राजकारणात पाहायला मिळत आहेत यावरून मनसे MNS अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी भाजपवर कठोर शब्दात टीका केली आहे 

काय म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे  Raj Thackeray

आज एक जुलैला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना एस आय आर बाबत मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी उपस्थित माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील थोडाफोडीच राजकारण आणि भाजपवर सडकून टीका केली आहे राज ठाकरे म्हणाले की, " देशातील राजकारण भयानक आहे. घाणेरडं आहे. याचा भविष्यात भाजपला त्रास होणारच आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही. आताची कृती भविष्यात काय पायंडा पाडतो याचं भान राजकारण्यांना नसेल तर. कुठे नेणार आहोत देश? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

फोडाफोडीच्या राजकारणावर सडकून टीका 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले कि, " नरेंद्र मोदी नावाचा एक पत्ता आहे, तो सटकला की पत्त्यांच्या बंगला पडणार, जे काही टिकून आहे ते मोदींवर आहे. बाकीच्यांवर नाही. उद्या सत्ता गेल्यावर भाजपला असाच त्रास होईल. तेव्हा काय कराल. कुठेपर्यंत जायचं हे कळलं पाहिजे, फोडाफोडीचं राजकारण गलिच्छ आहे. हे उमदं राजकारण नाही. ज्या ज्या वेळी जगात एखाद्या सत्ताधाऱ्यांनी विरोधक किंवा दुश्मन संपवले आहेत. त्या त्यावेळी त्यांच्यात विरोधक आणि दुश्मन तयार झाले आहेत. त्यांनीच त्यांना संपवलं आहे. ही प्रक्रिया भाजपमध्ये सुरू झाली आहे. बाहेरचे विरोधक सोडून द्या. तुमच्यात जे विरोधक तयार होतील ते पाहा. हा जगाचा नियम आहे. आणीबाणीच्या वेळी तेच झालं होतं." अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपला सुनावले आहे.