RAIN UPDATE : पाऊस आला मोठा..! 'या' जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - टॉप न्यूज मराठी

मुंबई : जून महिन्यामध्ये ओढ दिलेल्या पावसानं आता महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. एक जुलैला हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मोठ्या प्रमाणावर पावसानं बॅटिंग केली. आज सकाळपासूनच मुंबईमध्ये धुवाधार पाऊस सुरूच आहे. दरम्यान आता पालघर जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी समोर येते आहे. मुंबईला पावसाने मोठ्या प्रमाणावर झोडपून काढल्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  

2 जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई,ठाणे, पनवेल, डोंबिवली आणि नवी मुंबई या भागामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग करत रस्त्यांना देखील नद्यांचा स्वरूप आणले. एकीकडे वाहतुकीचा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यातच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीच्या दृष्टीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिली असली तरी एक जुलैपासून चांगला पाऊस होणार आहे. त्यातच आता उद्या देखील हवामान खात्याने रेड कलर जारी केल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पाच ते सहा दिवस मुंबई आणि कोकण किनारपट्टी तसेच उपनगरात धुवाधार पाऊस होणार असा देखील अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आल आहे.