महाराष्ट्र : मुंबई हवामान वेधशाळेने पुढील 5 दिवसांचा जिल्हानिहाय हवामान अंदाज जारी केला आहे. यानुसार राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर 26 ऑगस्टनंतर राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहणार आहे.
23 ऑगस्ट 2026: आज पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, लातूर, नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांना Yellow Alert (मेघगर्जना, विजा) देण्यात आला आहे. तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली या तीन जिल्ह्यांना Orange Alert जारी करण्यात आला आहे. तिथे जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट आहे.
24 ऑगस्ट 2026: उद्या पुणे घाट, सातारा घाट, परभणी, नांदेड, हिंगोली, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये Yellow Alert असेल. उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोणताही इशारा नाही. राज्यात कुठेही ऑरेंज किंवा रेड अलर्ट नाही.
25 ऑगस्ट 2026: पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, चंद्रपूर, गडचिरोली या 5 जिल्ह्यांतच Yellow Alert राहील.
26 आणि 27 ऑगस्ट 2026: या दोन दिवशी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट आहे. म्हणजे कोणताही पावसाचा मोठा इशारा नाही. हवामान सर्वत्र सामान्य राहील.
शेतकरी आणि नागरिकांनी घाटमाथा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
माहिती स्रोत - IMD Mumbai