Rahul Gandhi : "विद्यार्थ्यांवर पॅलेट गन ? लोकशाहीची हत्या,आम्ही हे सहन करणार नाही ! " नीट आंदोलनावरून राहुल गांधी संतप्त, केंद्र सरकारवर घणाघात - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभर पेटलेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचे उपोषण मागे घेतले असले तरी "कॉकरोच जनता पार्टी - CJP" चे आंदोलन मात्र थांबले नाही. सरकारच्या आश्वासनांची अंमलबजावणी होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे CJP ने स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर 20 जुलै रोजी दिल्लीत झालेल्या लाठीचार्ज आणि पॅलेट गन हल्ल्यावरून आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.

या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

राहुल गांधी काय म्हणाले ?

राहुल गांधींनी आज काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले कि, "देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवली जाते का? हे पाकिस्तान किंवा काश्मीर नाही. ही देशाची राजधानी दिल्ली आहे. मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या आवाजाला गोळ्यांनी उत्तर देत आहे. लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. पेपर फुटला, घोटाळा झाला. पण शिक्षण मंत्री राजीनामा देण्याऐवजी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करायला सांगतात. ही निर्लज्जता आहे. राहुल यांनी पुन्हा एकदा CJP च्या मागणीला पाठिंबा देत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. "नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा." असे राहुल गांधी म्हणाले आहेत. पेपरफुटीमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली. शांततापूर्ण आंदोलन चिरडणे, विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरणे हे ब्रिटीश राजवटीची आठवण करून देते. आम्ही हे सहन करणार नाही." अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. 

नेमके काय घडले 20 जुलैला ?

20 जुलै रोजी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. याच दिवशी सोनम वांगचुक आणि CJP च्या वतीने "संसदेवर मोर्चा" काढण्याची हाक देण्यात आली होती. 

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जंतर-मंतर येथेच थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला ,अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या,पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप CJP आणि विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

आता पुढे काय?

1.  काँग्रेसचा देशव्यापी निषेध : उद्या सर्व राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते "विद्यार्थी बचाव" आंदोलन करणार आहेत.

2.  संसदेत गोंधळ : काँग्रेस आणि इंडिया आघाडीने संसदेत या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे.

3.  CJP चा पवित्रा : सोनम वांगचुक यांनी म्हटले आहे, "सरकारने लेखी आश्वासन दिले आहे. पण जोपर्यंत कृती होत नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहणार."

दरम्यान दिल्ली पोलिसांनी "आत्मरक्षणासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला" असे स्पष्टीकरण दिले आहे. पॅलेट गन वापरल्याचे त्यांनी मात्र नाकारले आहे.