Raghav Chaddha : "आता सहन करा..!" आम आदमी पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राघव चड्ढा यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : राजकारणामध्ये सध्याच्या काळात या पक्षातून त्या पक्षात जाणे हे नवीन राहिलेले नाही. दरम्यान सध्या महाराष्ट्रासह देशात देखील मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी AAP पक्षातून राघव चढ्ढा यांनी काढता पाय घेऊन भाजपसोबत BJP  हात मिळवणी केली होती. दरम्यान या पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर टीका करणे सुरू होते. अशातच त्यांचे मिम्स व्यंगचित्र सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये होते. दरम्यान या पोस्ट हटवण्याची मागणी त्यांनी केली होती. सार्वजनिक जीवनातील नेत्यांनी व्यंग टीका आणि उपरोधिक विनोद हा आपल्या जीवनाचा अपरिहार्य भाग समजून तो सहन करण्याची सवय ठेवावी असा थेट आदेश राघव चड्ढा यांना दिला आहे. 

भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून राघव चड्ढा यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते आहे. याप्रकरणी राघव चड्ढा Raghav Chaddha यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचा संरक्षण आणि मान हानिकारक मजकूर हटवण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. दरम्यान याचिका दाखल करते वेळी त्यांनी त्यांच्या विरोधातील 52 डिजिटल दस्तावेज देखील आक्षेपार्ह असलयाचे नमूद केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने 52 पैकी केवळ पाच दस्तावेज हटवण्याचे आदेश दिले आहेत. 

दिल्ली उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणानुसार राजकीय पक्षांचे निर्णय, आघाड्या ,धोरणे आणि कामकाज यांवर विनोद किंवा व्यंग करणे हे लोकशाहीतील राजकारणाचा महत्त्वाचा भाग आहे. राजकीय नेत्यांच्या निर्णयामुळे जनतेत किंवा विरोधी पक्षांमध्ये टीका नाराजी किंवा प्रतिक्रिया उमटू शकतात. अनेकदा ती व्यंगात्मक स्वरूपात व्यक्त होते. मात्र त्यामुळे सामग्री आपोआप मानहानिकारक किंवा कक्षेपार्ह ठरत नाही, असे न्यायमूर्ती प्रसाद यांनी म्हटले आहे.