QUEEN 2 : कंगना राणावतच्या गाजलेल्या क्वीनच्या दुसऱ्या पार्टमध्ये 'हा' मराठमोळा अभिनेता कंगना सोबत करणार स्क्रीन शेअर; प्रमुख भूमिकेत झाला सिलेक्ट - टॉप न्यूज मराठी

मनोरंजन : कंगनाच्या Kangana Ranavat क्वीन Queen चित्रपटाला प्रेक्षकांना बराच काळ वेड लावले होते. चित्रपटातील गाणी, कंगनाचा अभिनय आणि विशेष करून क्वीन चित्रपटाची कथा तगडी होती.  त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगला गल्ला जमवला होता. दरम्यान आता क्वीनचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्थात लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे. पण खास गोष्ट म्हणजे या चित्रपटामध्ये कंगना राणावत सोबत बॉलीवूडचा कोणताही अभिनेता नसून मराठमोळा अभिनेता कंगना सोबत स्क्रीन शेअर करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 

कंगना राणावतने नुकत्याच 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. यानंतर आता क्वीनच्या दुसऱ्या भागाच शूटिंग लवकरच सुरू होणार असून शैतान सारख्या चित्रपटाचा दिग्दर्शन केलेले दिग्दर्शक विकास बेहेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर कंगना सोबत क्वीन २ मध्ये मराठमोळा अभिनेता सुबोध भावे Subodh Bhave  तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. 

कंगनाने पहिल्या भागात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जबरदस्त कंटेंटमुळे चित्रपट प्रचंड गाजला होता. तर आता मराठी चित्रपट सृष्टीतील सुबोध भावे सारखा उमदा अभिनेता तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सुबोध भावे यांनी देखील मराठी चित्रपटांमध्ये बालगंधर्व, डॉक्टर काशिनाथ घाणेकर, लोकमान्य एक युगपुरुष असे अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यामुळे आता सुबोध आणि कंगनाची जोडी पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांमध्ये विशेष करून मराठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता जास्त आहे.