PUNIT BALAN : “गणेशोत्सवात DJ कशाला ? पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्या” ! उद्योजक पुनीत बालन यांचे प्रतिपादन - टॉप न्यूज मराठी

पुणे : गणेशोत्सवात DJ चा वापर करावा की पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, या मुद्द्यावर गणेश मंडळांमध्ये वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. दरम्यान पारंपरिक वाद्य कि DJ यावर उद्योजक आणि गणेश मंडळांशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असलेले पुनीत बालन यांनी DJ न लावण्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे. 

उद्योजक पुनीत बालन यांनी याविषयी आपली रोखठोक भूमिका मांडताना म्हंटले आहे कि, "गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वारशाचे दर्शन घडविणारा उत्सव असून तो सांस्कृतिक आणि पारंपरिक वाद्यांनीच साजरा झाला पाहिजे", असे मत त्यांनी व्यक्त केले.  गणेशोत्सवात DJ का लावू नये, यामागचे कारणही बालन यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवाला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. ढोल-ताशा आणि अन्य पारंपरिक वाद्यांमुळे या उत्सवाची ओळख आहे. 

पुण्यात दरवर्षी 24 तास गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असते. पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या दणदणाटात सण साजरा होतो. पण खरंतर डीजेचा आवाज देखील काही काळाचा आनंद देऊ शकतो असे म्हणावे लागेल. कारण काही तासानंतर हा आवाज अक्षरशः असाह्य होतो. एकंदरीत गणेश मांडले याववर काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.