पुणे : गणेशोत्सव काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१)(ए)(बी), ११६(४) व ११७ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश निर्गमित केला आहे.
दि. १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणपती विसर्जनापर्यंत २४ तास खालील रस्त्यांवर जड/अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे—
अत्यावश्यक सेवेतील वाहने, जसे की अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने तसेच गणेश देखावे वाहतूक करणारी वाहने यांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.