पुणे : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 7 जुलै 2026 रोजी श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान होणार आहे, यादृष्टीने ग्रामीण हद्दीत पालखी प्रस्थान सोहळा बंदोबस्त 11 ते 15 जुलै या कालावधीत असून पालखी मार्गावरील वाहतूकीमध्ये बदल करुन ती पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यांनी जारी केले आहेत.
लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम) : 12 जुलै रोजी पहाटे २ वाजेपर्यंत ते रात्री 24 वा. पर्यत पुणे बाजुकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला या मार्गाचा वापर करतील तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाहूकडे येणारी वाहने चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली यामार्गाचावापर करतील.
यवत ते वरवंड (मुक्काम वरवंड) :13 जुलै रोजी पहाटे 2 वा. पासून ते रात्री 24 वा.पर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने. हडपसर वरुन मगरपट्टा मार्गे-लोणीकंद-केसनंद-वाघोली-राहू-पारगाव- न्हावरे-कष्टी-दोंड-कुरकुंभ मार्गे जातील. तर सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहने कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे या मार्गाचा वापर करतील.
वरवंड ते उंडवडी ता. बारामती (उंडवडी मुक्काम) : 14 रोजी पआटे 2 वा.पासून ते 24 वा. पर्यंत पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणारी वाहतुक चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच 14 जुलै रोजी पहाटे २ वा. ते रात्री २४ वा. पर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हा रोड बंद राहील. सदरची वाहतूक भिगवण मार्गे बारामतीला जाईल व बारामतीकडून येताना भिगवण मार्गे सोलापूर-पुणे रोडला येईल. तसेच बारामती –पाटस मार्गाने जातील तसेच पाटस बारामती जाणारी वाहने पाटस-चौफुला-सुपा-लोणीपाटी-बारामती या मार्गाने जातील.
उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम) : 15 जुलै रोजी पहाटे 2 वा. ते रात्री 24 वा. पर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हा रोड बंद राहिल. सदरची वाहतूक भिगवण मार्गे बारामतील जाईल व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर –पुणे रोडला जातील.
बारामती ते सणसर ( सणसर मुक्काम) : 16 जुलै रोजी पहाटे 2 वा. ते 24 वा. पर्यंत जंक्शन ते बारामती हा वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात येणार असून वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथुन कळसमार्गे बारामती अष्टी वळविण्यात येत आहे. बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण कळसमार्गे जंक्शनकडे जाईल.
सणसर ते निमगाव केतकी (निमगाव केतकी मुक्काम) : 17 जुलै रोजी पहाटे 2 वा. पासुन ते 18 जुलै रोजी रात्री 24 वा. पर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारीसर्व प्रकारची वाहने बारामती-कळंब-बावडा-इंदापूर व बारामती-भिगण्वण-इंदापूर यामार्गाचावापर करतील. तसेच इंदापूर कडून बारामतीकडे जाणारी सर्व पकारची वाहने इंदापूर –बावडा-कळंब-बारामती व इंदापूर-भिगवन-बारामती यामार्गाचा वापर करतील.
निमगाव केतकी ते इंदापूर (इंदापूर मुक्काम) : 18 जुलै रोजी पहाटे 2 वा. पासून ते रात्री 24 वा. पर्यंत निमगाव केतकीकडुन इंदापूरकडे जाणारीवाहतुक बंद राहील. इंदापूकडून जाणारी वाहतूक लोणी देवकर-कळंब-जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी –देवकर-भिगवण मार्गे बारामतीकडे जातील.
इंदापूर : 19 जुलै रोजी पहाटे ४ वा. पासून ते रात्री 20 वा. पर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतुक ही अकलुज-बावडा-नातेपुते-बारामती मार्गे जातील. अकलुज कडून बारामती व पुणे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. 19 जुलै रोजी इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून, त्यावरील वाहतुक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बायपासने वळविली जाईल.
इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम) : 19 जुलै रोजी पहाटे 2 वा. पासून रात्री 24 वा. पर्यंत व 22 जुलै पासून पहाटे 2 वा. पासून ते दुपारी 12वा. पर्यंत इंदापूर अकलुज रोडवरील वातुक पुर्णपणे बंद राहील. इंदापूर ते अकलुज या मार्गावरील वाहने इंदापूर –हिंगणगाव-टेंभुर्णी-गणेशगाव-माळीनगर-अकलुज या मार्गाचा वापर करतील. तसेच अकलुज ते इंदापूर यामार्गावरील वाहने यांनी अकलूज-नातेपूते-वालचंदनगर-जंक्शन-भिगवण या मार्गाचावापर करतील.
तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.