PUNE : MPSC आंदोलनात जरांगे पाटलांची एन्ट्री, पुण्यात काय म्हणाले ? - टॉप न्यूज मराठी

पुणे: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एन्ट्री घेतली आहे. पुण्यातील शास्त्री रोडवरील आंदोलनस्थळी त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, सरकार हुशार पोरांना नोकऱ्या देत नाही, पेपर फोडून त्यांचे भविष्य खराब करत आहे. जोपर्यंत MPSC अध्यक्षांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मी विद्यार्थ्यांसोबत आहे.

गेल्या 5 दिवसांपासून हजारो विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्या आहेत - अध्यक्षांचा राजीनामा आणि पेपरफुटीची चौकशी. सकाळी राज ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर आता जरांगे पाटील आल्याने आंदोलन आणखी पेटले आहे. सरकारने 48 तासात निर्णय घ्यावा, अन्यथा पुणे बंद करू असा इशारा देण्यात आला आहे.