पुणे : 38 व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना आज सोमवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीएचे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनुश्री चौधरी यांच्या हस्ते ही प्रतिष्ठापना करण्यात आली. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरुजी यांनी याचे पौरोहित्य केले. या निमित्ताने हॉटेल सारस येथील हॉल आकर्षक सजावटीने सुशोभित करण्यात आला होता.
यंदाच्या प्रतिष्ठापनेसाठी येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेली गणेश मूर्ती आवर्जून आणण्यात आली होती, हे या वर्षीचे विशेष आकर्षण ठरले.
याप्रसंगी पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अॅड. अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, रमेश बागवे, सुनील शिंदे, अबेदा इनामदार, आय. पी. इनामदार, काका धर्मावत, राजू साठे, अतुल गोंजारी, द. स. पोळेकर, बाळासाहेब अमराळे, सुप्रिया ताम्हाणे, अॅड. अनुराधा भारती, अशोक मेमजादे, डॉ. रवी चौधरी, कर्ना उपाध्याय, आबा जगताप, संयोगिता कुदळे, तेजश्री अडिगे, नावेद अत्तार यांच्यासह विनोद सुर्वे, नामदेव चाळके, सचिन खवले, विजय शेटे आणि एन. आय. ई. एम. चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.