Pune Festival 2026 : पुणे फेस्टिव्हलच्या 38 व्या वर्षानिमित्त व्हॉईस ऑफ पुणे स्पर्धेचे आयोजन, ऑडिशन्स 12 आणि 13 सप्टेंबरला - टॉप न्यूज मराठी

पुणे - पुणे फेस्टिव्हलच्या गौरवशाली ३८ व्या वर्षानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही व्हॉईस ऑफ पुणे या हिंदी सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या १५ वर्षांपासून ही स्पर्धा पुण्यातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा म्हणून ओळखली जाते. पुणेकर गायकांना मोठे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या स्पर्धेमध्ये दोन वयोगट ठेवण्यात आले आहेत. पहिला गट २३ ते ३९ वर्षे आणि दुसरा गट ४० वर्षांपुढील गटासाठी आहे. स्पर्धा एकल आणि द्वंद्व गीत अशा दोन प्रकारात होणार असून प्रत्येक गटात विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून यामध्ये आंतर महाविद्यालयीन गटाचाही समावेश करण्यात आला आहे. या गटात विजेत्या महाविद्यालयाला पुणे फेस्टिव्हल करंडक देऊन गौरवण्यात येणार आहे.

या स्पर्धेच्या ऑडिशन्स १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहेत. तर महा अंतिम फेरी लाईव्ह म्युझिकसह २० सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक अॅड. अनुराधा भारती यांच्याशी ९४२२०७८९५६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन माध्यम समन्वयक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी केले आहे.