PUNE CRIME : पुणे पोलिसांची मोठी कारवाई, चार कोटी 99 लाखांचा 455 किलो अमली पदार्थ जाळून नष्ट - टॉप न्यूज मराठी

PUNE CRIME : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ड्रग मुक्त भारत या केंद्र सरकारच्या संकल्पनेअंतर्गत पुणे शहर पोलिसांनी गुन्हे शाखेने आणि 23 पोलीस ठाण्यांनी जप्त केलेला तब्बल चार कोटी 99 लाख 19 हजार 764 रुपये किमतीचा 455 किलो 84 ग्रॅम 946 मिलीग्रॅम अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आला आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील 23 पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 23 पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट 1, 2, 3, 4 आणि अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी केलेल्या कारवाईचा समावेश आहे. पुणे शहरातील फरासखाना, भारती विद्यापीठ, समर्थ, बंडगार्डन, हडपसर, कोंढवा, वानवडी, विमाननगर, चंदननगर, खडक, विश्रांतवाडी, येरवडा, मुंढवा, लोणी काळभोर, काळेपडळ या पोलीस ठाण्यांसह एन.डी.पी.एस, गुन्हेगारी शाखा, गोपनीय विभाग, एम.डी. मेथॅम्फेटामाईन, हेरॉईन, ब्राऊन शुगर, गर्द पावडर, चरस, हशिष ऑईल, अफीम आणि डोडाचुरा यासह नेट्राझेपम 10 एमजी आणि अल्प्राझोलम 0.5 एमजी टॅबलेट असा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता.

दि. 25/08/2026 रोजी ड्रग डिस्पोजल कमिटी यांचे परवानगीनुसार हा साठा नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुणे शहर येथे रांजणगाव एमआयडीसी ता. शिरूर जि. पुणे येथे 23 पोलीस ठाण्यांमधील आणि गुन्हे शाखेतील एकूण 455 किलो 84 ग्रॅम 946 मिलीग्रॅम असा मिळून 4 कोटी 99 लाख 19 हजार 764 रुपयांचा मुद्देमाल शासनाने नियुक्त केलेल्या कारखान्यामध्ये जाळून नष्ट करण्यात आला.

यामध्ये 425 किलो 589 ग्रॅम 823 मिलीग्रॅम गांजा, 200 ग्रॅम ओजी कुश गांजा, 1 किलो 165 ग्रॅम 285 मिलीग्रॅम एम.डी, 150 ग्रॅम 400 मिलीग्रॅम मेथॅम्फेटामाईन, 54 ग्रॅम 400 मिलीग्रॅम हेरॉईन, 8 ग्रॅम 800 मिलीग्रॅम ब्राऊन शुगर, 2 ग्रॅम 300 मिलीग्रॅम गर्द पावडर, 100 ग्रॅम 870 मिलीग्रॅम चरस, 65 ग्रॅम 80 मिलीग्रॅम हशिष ऑईल, 25 किलो 830 ग्रॅम 200 मिलीग्रॅम अफीम डोडाचुरा, 3 किलो 294 ग्रॅम नेट्राझेपम टॅबलेट आणि 506 ग्रॅम 500 मिलीग्रॅम अल्प्राझोलम आणि गांजा मिश्रित गोळ्या यांचा समावेश होता.

वरील अमली पदार्थ नष्ट करण्याची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त गुन्हे हसन गौहर, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 3 शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच अमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पुणे शहर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सोनाली, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, अमोल गवाणे, पोलीस अंमलदार संजयकुमार राजे, विशाल गिलबिले, राहुल मंडल, अमरसिंग तोपकर, अमोल सरडे, अतुल चीरसागर, तुषार साबळे, मंगेश गोंद, अक्षय शिरके, सुरेश सावळे, सचिन चव्हाण, प्रशांत काकळजकर, निशोर शरद बांडे, गायकवाड, जोगारे, कुंभार, यादव, देवकाते, बोंदरे आणि महिला पोलीस अंमलदार सुकेशनी आंबले, आरती शिंदे यांनी ही कारवाई पार पाडली.